मुंबई, 9 मे : उन्हाळी हंगामात अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (Chain Pulling) च्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईतील अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात वाढ केली आहे. नवे दर 9 मेपासून म्हणजेच आजपासून लागू होतील. मध्य रेल्वेने (Central Railway) या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 10 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
मात्र, ही दरवाढ तात्पुरती आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार हा दर 9 मे ते 23 मे पर्यंत लागू असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर (Dadar), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan) आणि पनवेल (Panvel) या स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवण्यात आले आहेत.
Umang App: केवळ एका App द्वारे घेता येईल अनेक सरकारी सुविधांचा लाभ, असे होतील फायदे
अनावश्यक कारणांमुळे चेन पुलिंग
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रवासी उशीरा येणे आणि मध्यभागी स्टेशनवर उतरणे यासारख्या अनावश्यक कारणांमुळे चेन पुलिंग करत आहेत. अशा घटनांसाठी मध्य रेल्वे सज्ज असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने आणि इतर प्रवाशांच्या मदतीने बहुतांश घटनांमध्ये गुन्हेगार पकडले जात आहेत, तर काही वेळा अज्ञात लोकांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत. मिंटच्या एका अहवालानुसार, 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत मुंबई विभागात चेन पुलिंगच्या 332 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी 53 प्रकरणे वैध कारणांखाली तर 279 प्रकरणे अनावश्यक कारणांखाली नोंदवण्यात आली आहेत. यापैकी 188 जण भारतीय रेल्वे कायद्याच्या योग्य कलमांतर्गत दोषी आढळले असून 94000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारत सरकारकडून रोजगार मिशनअंतर्गत नोकरी देण्याचा दावा, वाचा काय आहे यामागचं सत्य
चेन पुलिंग सिस्टम कसे कार्य करते?
जेव्हा लोकल ट्रेनची अलार्म चेन ओढली जाते तेव्हा ती संबंधित डब्यातील एक लहान लीव्हर विस्थापित करते आणि ट्रेनच्या मोटरमन आणि गार्डला अलर्ट पाठवते. ट्रेन पुन्हा धावण्यासाठी हा लीव्हर निश्चित करावा लागतो. त्याच वेळी, जेव्हा मेल/एक्स्प्रेस ट्रेनची अलार्म साखळी ओढली जाते, तेव्हा ते पॅसेंजर अलार्म सिग्नल डिव्हाइस (PASD) अॅक्टिव्ह करते. गार्ड, टीटीई किंवा ट्रेनचे इतर अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन दुरुस्तानंतर मग ट्रेन पुन्हा रवाना केली जाते. चेन पुलिंगने ट्रेन थांबवल्याचा परिणाम असा होतो की त्यामागील इतर ट्रेन्सही लेट होतात. यामुळे ट्रेनच्या टाईमटेबलवर परिणाम होतो आणि काही लोक वगळता इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central railway, Mumbai