मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO व्याजाच्या पैशांसाठी यावर्षी वाट पाहावी लागणार नाही? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना पैसे लवकर मिळण्याची शक्यता

EPFO व्याजाच्या पैशांसाठी यावर्षी वाट पाहावी लागणार नाही? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना पैसे लवकर मिळण्याची शक्यता

EPFO मध्ये नोंदणीकृत सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सरकारने 2021-22 मध्ये PF वर 8.1 टक्के व्याज जाहीर केले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये पीएफचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 7 मे : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यावर्षी आपल्या करोडो ग्राहकांना मोठी भेट देऊ शकते. EPFO कडून 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याजाचे पैसे यावर्षी लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात येतील. मनीकंट्रोलच्या एक्स्क्लुझिव्ह रिपोर्टनुसार, ईपीएफओशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. EPFO लवकरच व्याजाचे पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करण्याच्या तयारीत आहे.

EPFO मध्ये नोंदणीकृत सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सरकारने 2021-22 मध्ये PF वर 8.1 टक्के व्याज जाहीर केले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये पीएफचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले.

दसरा-दिवाळीपर्यंत पैसे मिळतील

या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे ईपीएफओ यावर्षी दसरा-दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे पाठवणार आहे. ते म्हणाले, 8.1 टक्के व्याजदराचा प्रस्ताव मंजूर करणे अर्थ मंत्रालयाला (Finance Ministry) अधिक कठीण जाईल असं वाटत नाही. तसेच या वर्षीचे व्याज (PF Interest) खात्यात पटकन पाठवता येईल. तसे, सरकारी यंत्रणेत एखादी गोष्ट अधिकृतपणे जाहीर केल्याशिवाय ती निश्चित मानता कामा नये. तरीही या वर्षी व्याजाची रक्कम दोन-तीन महिने अगोदर मिळण्याची शक्यता आहे.

अलिबाबा कंपनीला नावाच्या गोंधळामुळे मोठा फटका; काही मिनिटात 26 अब्ज डॉलर्सचा फटका

दोन कारणांमुळे लवकरच पैसे मिळण्याची शक्यता

यावर्षी व्याजाचे पैसे लवकर मिळण्यामागे दोन मोठी कारणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिला म्हणजे PF वर सध्या 8.1 टक्के व्याजदर आहे, जो 43 वर्षांचा नीचांक आहे. अशा परिस्थितीत अर्थ मंत्रालयाकडून त्याचा आढावा घेण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरे कारण म्हणजे पैसे लवकर ट्रान्सफर केल्याने, EPFO ​​च्या आर्थिक स्थितीला फायदा होईल आणि PF सेटलमेंट दरम्यान त्याचा भार कमी होईल.

पंजाब नॅशनल बँकेचा ग्राहकांना झटका; व्याजदरात वाढ, लोन किती महागणार? चेक करा

EPFO ​​ला असा फायदा मिळेल

EPFO ​​ला 2021-22 साठी निश्चित केलेले व्याज वित्त मंत्रालयाकडून मंजूर होईपर्यंत जुन्या व्याजदरावर प्रत्येक दाव्याचा निपटारा करावा लागतो. जुना व्याजदर 8.5 टक्के आहे आणि नुकतेच ठरलेले 8.1 टक्के व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर त्यांच्या क्लेम सेटलमेंट नवीन व्याजदराने होईल आणि EPFO ​​ला जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

EPFO त्याच्याकडे जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 85 टक्के रक्कम सरकारी सिक्युरिटीज आणि बाँड्स सारख्या डेट पर्यायांमध्ये गुंतवते, तर 15 टक्के शेअर बाजारात ETF द्वारे गुंतवते.

First published:

Tags: Epfo news, PF Amount, Pf news