जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Credit Card: इंधन भरण्यापासून तर शॉपिंगपर्यंत, या क्रेडिट कार्डवर मिळतात बंपर रिवॉर्ड

Credit Card: इंधन भरण्यापासून तर शॉपिंगपर्यंत, या क्रेडिट कार्डवर मिळतात बंपर रिवॉर्ड

एचडीएफसीचं खास क्रेडिट कार्ड

एचडीएफसीचं खास क्रेडिट कार्ड

Credit Card: सध्याच्या काळात सर्वच जण क्रेडिट कार्ड वापरतात. कारण त्याचे अनेक फायदे असतात. मात्र आता एका क्रेडिट कार्डवर तुम्हाला बंपर ऑफर मिळू शकणार आहेत. हे क्रेडिट कार्ड कोणतं? चला पाहूया…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 जून : देशातील आघाडीची बँक HDFC बँक ग्राहकांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे कार्ड जारी करते. तुम्ही Amazon आणि Flipkart वरून खरेदी करत असाल किंवा Zomato आणि Swiggy वरून फूड ऑर्डर केले तर HDFC बँकेचे मिलेनिया क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी उत्तम फायदेशीर आहे. हे कॅशबॅक क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. जे ग्राहकांना ‘टॅप आणि पे’ ची सुविधा देखील देते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते.

News18लोकमत
News18लोकमत

मिलेनिया क्रेडिट कार्डचे फीचर्स

-मिलेनिया क्रेडिट कार्डला Amazon, Flipkart, BookMyShow, Cult.fit, Myntra, Sony LIV, Swiggy, Tata CLiQ, Uber आणि Zomato वर खर्च केल्यावर 5% कॅशबॅक पॉइंट मिळेल. या कॅटेगिरीमध्ये, प्रत्येक बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त 1000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध असेल. -फ्यूल, रेंट पेमेंट, सरकारी पेमेंट वगळता सर्व खर्चांवर 1% कॅशबॅक पॉइंट उपलब्ध असेल. या कॅटेगिरीमध्ये, प्रत्येक बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त रु 1000 कॅशबॅक उपलब्ध असेल. -कार्डधारकाला वर्षातून 8 वेळा कॉम्प्लिमेंट्री डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश मिळतो. तर, एका तिमाहीत जास्तीत जास्त 2 वेळा कॉम्प्लिमेंट्री डोमेस्टिक एयरपोर्ट लाउंज एक्सेस सुविधा उपलब्ध आहे. -एका कॅलेंडर तिमाहीत 1 लाख रुपये खर्च केल्यावर, कार्डहोल्डरला 1000 रुपयांचे गिफ्ट कार्ड दिले जाते. -या कार्डद्वारे पेट्रोल पंपांवर 400 ते 5 हजार रुपयांच्या फ्यूल खरेदीवर 1 टक्के फ्यूल सरचार्ज भरावा लागणार नाही. बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त रु 250 फ्यूल सरचार्ज माफ केला जाऊ शकतो.

Investment Tips: ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं प्लानिंग करताय? होतात हे 5 नुकसान

मिलेनिया क्रेडिट कार्डसाठी एलिजिबिलिटी

-पगारदार किंवा सेल्फ इंप्लॉइड व्यक्ती हे कार्ड घेऊ शकते. -किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. -दरमहा किमान 35 हजार रुपये पगार असणारे नोकरदार अर्ज करू शकतात. -6 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले सेल्फ इंप्लॉइड या कार्डसाठी अर्ज करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात