मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सर्वसामान्य माणसानं करायचं काय? घराच्या किंमती वाढल्यानंतर Loan ही महाग

सर्वसामान्य माणसानं करायचं काय? घराच्या किंमती वाढल्यानंतर Loan ही महाग

 नवे दर 7 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. या घोषणेनंतर शेअर मार्केटमधील या बँकेच्या स्टॉकची किंमत वाढली आहे.

नवे दर 7 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. या घोषणेनंतर शेअर मार्केटमधील या बँकेच्या स्टॉकची किंमत वाढली आहे.

नवे दर 7 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. या घोषणेनंतर शेअर मार्केटमधील या बँकेच्या स्टॉकची किंमत वाढली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : महागाई वाढतच आहे आणि त्याचा झळा अधिक तीव्र होत आहेत. आता वाढत्या महागाईमध्ये आणखी एका बँकेनं झटका दिला आहे. या बँकेनं व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे लोन महाग होणार आहे. नवे दर 7 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. या घोषणेनंतर शेअर मार्केटमधील या बँकेच्या स्टॉकची किंमत वाढली आहे.

एचडीएफसी बँकेने व्याजदरात वाढ केली. बँकेने एमसीएलआरचे दर 0.30% वरून 0.35% म्हणजेच 5 टक्क्यांवा वाढवण्याचा निर्णय घेतला. हे नवीन दर ७ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. या निर्णयानंतर एमसीएलआरवर आधारीत सर्व गृह-वैयक्तिक आणि वाहन कर्जाचे EMI आणि एकूण कर्ज वाढणार आहेत.

शेअर मार्केटमध्येही एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. या शेअरची किंमत साधारण १५०० रुपयांच्या जवळ आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटवर नवे दर जाहीर केले आहेत.

Loan Recovery Rules: कर्जाची परतफेड करू न शकल्यास बँक देणार नाही त्रास, तुम्हाला मिळतात हे अधिकार

7 नोव्हेंबर 2022 पासून लागू असलेल्या नवीन दरांनुसार- रातोरात एमसीएलआर दर 7.90% वरून 8.20% पर्यंत वाढले आहेत. एका महिन्यासाठी एमसीएलआरचे दर 7.90% वरून 8.25% पर्यंत वाढले आहेत.

तीन महिन्यांचा आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर अनुक्रमे 8.30 टक्के आणि 8.40 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षाचा एमसीएलआर आता 8.55%, दोन वर्षांचा एमसीएलआर 8.30% ते 8.65% आणि तीन वर्षांचा एमसीएलआर आधीच्या 8.40% वरून 8.75% असणार आहे.

महाग का झालं कर्ज

आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. या भागात आता एचडीएफसी बँकेनेही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने महिन्यावर आधारावर विविध कालावधीसाठी त्यांचे किमान कर्ज दर किंवा एमसीएलआर जाहीर करणे बँकांना आवश्यक आहे.

Home Loan: ‘या’ 5 बँका देतायेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, चेक करा लेटेस्ट रेट

बँका आपल्या शाखेत रातोरात, एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष आणि इतर कोणत्याही कार्यकाळासह व्याजदराची माहिती देतात. याशिवाय बँकांच्या अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही त्यांचा एमसीएलआर दर मिळवू शकता.

First published:

Tags: Hdfc bank, Home Loan, Instant loans, Loan, Money