जाहिरात
मराठी बातम्या / मनी / दिवाळीला सोनं खरेदी करताय? मग ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

दिवाळीला सोनं खरेदी करताय? मग ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या 3 गोष्टी, ज्वेलर्स कधीच करू शकणार नाहीत फसवणूक

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या 3 गोष्टी, ज्वेलर्स कधीच करू शकणार नाहीत फसवणूक

जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा बिलाकडे नक्कीच लक्ष द्या. त्यात कोणतं शुल्क जोडलं गेलंय हेही पाहा? अनेकदा ज्वेलर्स बिलामध्ये वेगवेगळे शुल्क जोडतात आणि माहिती नसल्यामुळं ग्राहक काहीही बोलू शकत नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर: ज्या सणाची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत असतो, तो दिवाळी सण आता काही दिवसांवर येऊन ठेवलाय. तुम्ही वर्षभरापासून या सणाची वाट पाहत असाल. कारण दिवाळीच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टींची खरेदी करतो. दिवाळी आणि धनत्रयोदशीला दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मागील दोन दिवाळी कोरोनामुळे निस्तेज झाल्या होत्या, पण यावेळी परिस्थिती चांगली आहे. वास्तविक दिवाळी आणि धनत्रयोदशीला स्त्रिया दागिने खरेदी करतात, त्याचा संबंध गुंतवणूक आणि लक्ष्मीच्या आगमनाशी जोडला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही यावेळी दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. ज्याच्या मदतीनं तुम्ही योग्य किमतीत शुद्ध दागिने खरेदी करू शकाल आणि ज्वेलर्स तुमची अजिबात फसवणूक करू शकणार नाहीत. आजच्या डिजिटल युगात आता लोक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन दागिने खरेदी करतात, ज्यामध्ये फसवणुकीच्या घटना कमी झाल्या आहेत. पण जर तुम्ही दागिन्यांच्या दुकानात जाऊन खरेदी करत असाल तर नक्कीच काळजी घ्या. वास्तविक जेव्हा तुम्ही ज्वेलर्सकडून दागिने खरेदी करता तेव्हा बिलामध्ये कोणतं शुल्क जोडं गेलं आहे ते पहा. अनेकदा ज्वेलर्स ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी बिलात वेगवेगळे शुल्क जोडतात आणि माहिती नसल्यामुळे ग्राहक काहीही बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला दागिने खरेदी करण्याच्या योग्य टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीनं तुम्ही फसवणूक होण्यापासून वाचू शकता आणि योग्य दागिने खरेदी करू शकता. हेही वाचा:  गृहकर्जाचा EMI वेळेवर न भरण्याचे काय परिणाम होतात? कठीण प्रसंगांना कसं द्यावं तोंड? केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार दागिने खरेदी करताना ग्राहकांना फक्त तीन गोष्टी द्याव्या लागतात. प्रथम- दागिन्यांची किंमत (वजनानुसार), दुसरी- मेकिंग चार्ज आणि तिसरी- जीएसटी (3 टक्के) भरावा लागेल. तुम्ही दागिन्यांसाठी ऑनलाइन पेमेंट करा किंवा ऑफलाइन, तुम्हाला त्यावर फक्त 3% GST भरावा लागेल. याशिवाय ज्वेलर्सकडून कोणतेही शुल्क आकारले जात असेल तर तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता. कारण काही ज्वेलर्स पॉलिश, वजन किंवा मजूर शुल्काच्या नावाखाली काही रुपये वेगळे घेतात, जे नियमाविरुद्ध आहे. तुम्ही अशा ज्वेलर्सविरुद्ध तक्रारही करू शकता. तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता- तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की दागिने 24 कॅरेट सोन्याचे नसतात. बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक दागिने 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे आहेत. त्यामुळे खरेदी करताना लक्षात ठेवा की त्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचा भाव किती असेल? ज्याच्या मदतीनं तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकाल.

News18लोकमत
News18लोकमत

सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही दागिन्यांच्या मेकिंग चार्जबद्दल वाटाघाटी करणे आवश्यक आहे. बहुतेक ज्वेलर्स वाटाघाटीनंतर मेकिंग चार्जेस कमी करतात. कारण दागिन्यांवर 30 टक्के मेकिंग चार्ज आकारला जातो. मेकिंग चार्जेसचा सर्वाधिक फायदा ज्वेलर्सना होतो. नेहमी मूळ बिल घ्या. जेणेकरून भविष्यात तुम्ही ते दागिने कोठेही विकायला जाल तेव्हा त्याची शुद्धता आणि वजन याबाबत कोणतीही अडचण येणार नाही. शुद्ध सोनं मिळण्यासाठी फक्त आणि फक्त हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा. हॉलमार्कमध्ये पाच अंक असतात. प्रत्येक कॅरेटची वेगळी ओळख असते. उदाहरणार्थ, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले असतं. यामुळे त्याच्या शुद्धतेबद्दल शंका नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात