मुंबई : पराठाप्रेमींसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे. आता पराठा खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पराठ्यावर १८ टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदाबादमधील वाडीलाल इंडस्ट्रीजने दाखल केलेल्या अपीलवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १८ टक्के GST लावणं चुकीचं आहे. त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. चपातीवर मात्र १८ टक्के GST लागणार नाही. पराठा आणि चपाती दोन्ही गव्हाच्या पीठापासूनच होतं त्यामुळे असे दोन वेगवेगळे GST लावू नयेत असं म्हणणं होतं.
वाडीलाल इंडस्ट्रीजने ही कंपनी अनेक प्रकारचे रेडी टू कूक म्हणजेच फ्रोजन पराठे बनवते. रोटी आणि पराठामध्ये फारसा फरक नाही, असा युक्तिवाद कंपनीने केला. दोन्ही पिठापासून बनवलेले असतात, त्यामुळे पराठ्यावरही 5 टक्के जीएसटी असावा.
एएएआरने कंपनीचा हा युक्तिवाद फेटाळून लावत पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लागेल असं स्पष्ट केलं. त्यानंतर ट्वीटरवर युजर्सनी संताप व्यक्त केला. लोकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही टीका केली आहे.
भाडेकरार पूर्ण वर्षाऐवजी फक्त 11 महिन्यांचाच का? कारण आणि कायदेशीर परिणाम
एका युजरने तर श्वास घेण्यासाठीही आता GST लावा असं म्हटलं आहे. पराठ्यावरून सोशल मीडियावर वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. आधीच महागाई वाढत आहे.
पराठा खाने के शौकीन लोगों के लिए बुरी ख़बर#Parathas पर लगेगा 18% #GST, रोटी या #Chapatti पर छूट जारी
चपाती से अलग है #पराठा, गुजरात #AAAR का फैसला #ReadyToEat #SemiCooked #PrePacked@CNBC_Awaaz@GST_Council@FinMinIndia pic.twitter.com/ecN2KBeVa0 — Alok Priyadarshi (@aloke_priya) October 13, 2022
Moonlighting : कंपनीला कसं कळतं की, त्यांचा कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी देखील काम करतोय?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. भारतातही जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किंमती महाग झाल्या आहेत. आता पराठ्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याने सोशल मीडियावर युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.