मुंबई : सरकारने दिवाळीआधी देशातील कोट्यवधी छोट्या व्यवसायिकांना एक दिलासा दिला आहे. सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. GST रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याची शक्यता आहे. ही तारीख वाढवण्यात येईल अशी चर्चा आहे.
सप्टेंबरचा जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली जाऊ शकते, जेणेकरून सणांची तयारी करणाऱ्या व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागणार नाही. सीबीआयसीने गुरुवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबरसाठी जीएसटी रिटर्न भरण्यासाठी व्यवसायांना अधिक वेळ दिला जाऊ शकतो.
सीबीआयसीच्या म्हणण्यानुसार, अनेक करदात्यांनी जीएसटीएन पोर्टल स्लो असल्याची तक्रार केली होती आणि रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याचा प्रस्तावही ठेवला होता. सध्या याबाबत चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर अंतिम तारीख वाढवून देण्यास मान्यता देण्यात येण्याची शक्यता आहे.
Diwali 2022 Bank Holidays : अरे देवा! पुढचे 6 दिवस बँका राहणार बंद, आजच करून घ्या काम
प्रत्येक महिन्याचा जीएसटीआर 3 बी फॉर्म पुढील महिन्याच्या 20, 22 किंवा 24 तारखेला भरला जातो. ही डेडलाइन प्रत्येक राज्यासाठी वेगळी आहे. ऑक्टोबरमध्येही या तारखांना सप्टेंबरचा जीएसटी रिटर्न भरायचा होता, मात्र आता ही मुदत वाढवली जाऊ शकते.
सीबीआयसीने सांगितले की, गुरुवार ही काही व्यवसायिकांना हा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र काहीजणांना पोर्टलमध्ये अडचणी आल्या. त्यामुळे GST भरता आला नाही. याबाबतची तक्रारही दाखल करण्यात आली होती. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
धक्कादायक! 75 टक्के ट्वीटर कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात?
ही मुदत वाढवण्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी जीएसटी काउन्सिलशी चर्चा होणार आहे त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे करदात्यांवर विलंब शुल्क किंवा व्याजाचा बोजा पडणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.