Home /News /money /

रशिया आणि युक्रेनमध्ये महत्त्वाचा करार, 'या' निर्णयामुळे भारताला कसा होईल फायदा?

रशिया आणि युक्रेनमध्ये महत्त्वाचा करार, 'या' निर्णयामुळे भारताला कसा होईल फायदा?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ब्लॅक सीमध्ये नाकेबंदी केली. त्यामुळे या समुद्रामध्ये असलेल्या युक्रेनच्या बंदरांमधून होणाऱ्या गव्हाच्या निर्यातीव गदा आली. आता दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार या समुद्रातल्या युक्रेनच्या बंदरांतून होणाऱ्या गव्हाच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे

पुढे वाचा ...
    इस्तंबूल, 23 जुलै : रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये गेले काही महिने सुरू असलेलं युद्ध अद्याप काही संपण्याचं नाव घेत नाहीये. या युद्धामुळे त्या दोन देशांवर तर परिणाम झालेच; पण साऱ्या जगावरही दुष्परिणाम झाले. युक्रेन हा अन्नधान्याचा आणि सूर्यफूल तेलाचा मोठा निर्यातदार देश आहे. या युद्धामुळे अन्नधान्याच्या, तसंच तेलाच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे सर्वत्र महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे; मात्र जागतिक अन्नधान्याच्या पुरवठ्यावर झालेला दुष्परिणाम निस्तरण्यासाठी आता रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये नुकताच एक करार झाला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुटेरस आणि तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसीप तय्यप अर्दोगान यांच्या उपस्थितीत नुकत्याच या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 'नवभारत टाइम्स'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ब्लॅक सी (Black Sea Ports) अर्थात काळ्या समुद्रात नाकेबंदी केली. त्यामुळे या समुद्रामध्ये असलेल्या युक्रेनच्या बंदरांमधून (Ukraine Ports) होणाऱ्या गव्हाच्या निर्यातीवर (Wheat Export from Ukraine) गदा आली. आता दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार या समुद्रातल्या युक्रेनच्या बंदरांतून होणाऱ्या गव्हाच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे; मात्र अर्थातच त्यासाठी मोठी नियमावली ठेवण्यात आली आहे. या साऱ्यामध्ये तुर्कस्तान (Turkey) आणि संयुक्त राष्ट्रसंघ (UN) मध्यस्थाची भूमिका निभावणार आहेत. जहाजात धान्य चढवण्याच्या कामावर तुर्कस्तान, युक्रेन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यानंतर युक्रेनचं पायलट जहाज पुढे असेल आणि धान्याची वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांना ते रस्ता दाखवील, जेणेकरून व्यापारी जहाजं रशियाने पेरलेल्या माइन्सवर धडकणार नाहीत. या सगळ्या गोष्टींवर तुर्कस्तानचं लक्ष असेल. रशियाला अशी भीती आहे, की या जहाजांच्या माध्यमातून युक्रेनला हत्यारं आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे रशियाच्या (Russia) या शंकेचं निरसन होण्यासाठी तुर्कस्तानकडून या जहाजांची तपासणीही केली जाईल. TATAच्या 'या' शेअरची दमदार कामगिरी, गुंतवणूकदारांची 1 लाखांची गुंतवणूक बनली 82 लाख इस्तंबूलमधल्या भव्य डोलमाबाहस पॅलेसमध्ये 22 जुलै रोजी हा करार झाला. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू आणि युक्रेनचे पायाभूत सुविधा मंत्री ओलेक्संद्र कुब्राकोव्ह यांनी या करारावर स्वतंत्रपणे स्वाक्षऱ्या केल्या. त्या वेळी दोघांनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. या करारामुळे आता जवळपास 10 अब्ज डॉलर्स मूल्याच्या धान्याची निर्यात करणं आता शक्य होणार असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं. हा करार 120 दिवसांचा असून, त्यानंतर त्याचं पुन्हा आपोआप नूतनीकरण होणार आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुटेरस म्हणाले, की 'काळ्या समुद्रातून आता आशेचा एक किरण दिसू लागला आहे. त्यामुळे जगाला असा दिलासा मिळणार आहे, की ज्याची गरज आधी कधीच पडली नव्हती.' Nirav Modi: EDची मोठी कारवाई, नीरव मोदीची 253 कोटींची मालमत्ता जप्त या कराराचा भारतालाही उपयोग होणार आहे. कारण युक्रेनमधून होणारी गव्हाची निर्यात थांबल्यावर भारतातून गव्हाची निर्यात वाढली होती. त्यामुळे गहू आणि पिठाच्या देशांतर्गत किमतींमध्ये वाढ झाली होती. या वर्षी भारतात गव्हाच्या पीठाच्या (Wheat Atta) किमतीत सुमारे 8 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे बिस्किटं, नूडल्स वगैरेंच्या किमतींमध्ये वाढ होणं साहजिकच होतं. आता हा करार झाल्यामुळे युक्रेनमधून गहू निर्यात पुन्हा होऊ लागेल. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर आलेला ताण कमी होऊन भारतात भाव घटण्यास मदत होऊ शकेल. दरम्यान, सध्या या करारान्वये युक्रेनमधून केवळ गव्हाच्या निर्यातीला परवानगी असून, त्यात खाद्यतेलाचाही समावेश करण्यात आला, तर खाद्यतेलाच्या किमतीही घटण्यास मदत होऊ शकेल. कारण युक्रेन हा सूर्यफूल तेलाचाही मोठा निर्यातदार आहे.
    First published:

    Tags: Money, Russia Ukraine

    पुढील बातम्या