मराठी बातम्या /बातम्या /मनी /

केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना देणार 80,000 रुपये? खरोखरच मिळणार का?

केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना देणार 80,000 रुपये? खरोखरच मिळणार का?

केंद्र सरकारकडून मुली आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अनेक वेळा या योजनांबाबत चुकीच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होतात.

केंद्र सरकारकडून मुली आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अनेक वेळा या योजनांबाबत चुकीच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होतात.

केंद्र सरकारकडून मुली आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अनेक वेळा या योजनांबाबत चुकीच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : सोशल मीडियावर दिवसभरात असंख्य खोट्या बातम्या पसरत असतात. अनेकदा आपणही सहानिशा न करता त्या पुढे पाठवतो. मात्र, यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. केंद्र सरकारकडून मुली आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अनेक वेळा या योजनांबाबत चुकीच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये केंद्र सरकार 'प्रधानमंत्री क्रेडिट योजने' अंतर्गत सर्व आधार कार्डधारकांच्या खात्यात 80,000 रुपये रोख रक्कम देत असल्याचा दावा केला जात आहे.

आधार कार्डशी संबंधित हा व्हिडीओ तुमच्याही मोबाईलवर आला असेल, तर फसवणूक टाळण्यासाठी योग्य माहिती नक्की घ्या. सावधगिरी आणि जागरूकतेनेच प्रतिबंध शक्य आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

'सरकारी अपडेट' नावाच्या यूट्यूब चॅनेलच्या या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकार 'प्रधानमंत्री क्रेडिट योजना' चालवत आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व आधार कार्डधारकांना त्यांच्या खात्यात 80,000 रुपये दिले जात आहेत. व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की ही योजना भारतातील सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 वरून 62 वर्षे ठेवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये लोकांना कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या राज्याचे नाव सांगण्यास सांगितले जात आहे.

वाचा - Fact Check: प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेअंतर्गत तरुणांना मिळतायेत 3400 रुपये; काय आहे सत्य?

सरकारने मेसेज फेक असल्याचे सांगितले

याबाबतची माहिती पीआयबी फॅक्ट चेक या सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून देण्यात आली आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या ट्विटमध्ये हा दावा खोटा असून केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे म्हटले आहे.

तुम्ही देखील फॅक्ट चेक करू शकता

तुम्हालाही असा कोणताही मेसेज मिळाल्यास, तुम्ही पीआयबीला तथ्य तपासणीसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा WhatsApp क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. ही माहिती PIB वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

First published:

Tags: Aadhar Card, Fake news