मुंबई, 15 जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited (JPL) चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक ( Facebook), इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल (Google)असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली. गुगलने एकूण 33,737 कोटी रुपये JIO प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणार असल्याचं मान्य केलं आहे, असं अंबानी म्हणाले. त्यांची ही गुंतवणूक फक्त आर्थिकच नव्हे तर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट असेल. Facebook, Intel, Qualcomm आणि Google या 4 मोठ्या भागिदारांखेरीज एकूण 14 गुंतवणूकदार जिओमध्ये असतील. त्यातले 6 तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातले गुंतवणूकदार आहेत तर 3 sovereign funds आहेत. अशा 14 गुंतवणूकदारांसह Jio ने 1,52,056 कोटींचा निधी उभा केला आहे, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. Google सारख्या जागतिक भागिदारामुळे फक्त वित्तपुरवठाच होणार असं नाही तर त्यामुळे जगभरात पोहोचण्यासाठी आवश्यक पाठबळ JPL ला मिळणार आहे, अशी आशा अंबानींनी व्यक्त केली. RIL च्या AGM मध्ये या गुंतवणुकीखेरीज 5G बद्दलची मोठी घोषणा झाली. देशी बनावटीची 5G सेवा पुढच्या वर्षी सुरू करण्याचा प्लॅन अंबानी यांनी जाहीर केला. जिओच्या ग्राहकांना पहिली मेड इन इंडिया 5G सेवा पुढच्याच वर्षी मिळण्याची शक्यता आहे.
#RILAGM | Jio launches #5G Solution under #AtmanirbharBharat. It will be 100% Made in India. It is dedicated to our PM #NarendraModi's vision of Atmanirbhar Bharat: #MukeshAmbani at #Reliance's 43rd AGM#RIL | #RelianceAGM LIVE: https://t.co/fimzuuogFA pic.twitter.com/aQoATrrXFj
— Moneycontrol (@moneycontrolcom) July 15, 2020
आत्मनिर्भर भारताच्या निर्धारामध्ये हा संपूर्ण भारतीय 5G प्लॅन मोठी जबाबदारी उचलेल, असंही अंंबानी यांनी स्पष्ट केलं.