जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 'या' Google Pay युजर्सच्या अकाउंटमध्ये जमा होतायत पैसे, पण का?

'या' Google Pay युजर्सच्या अकाउंटमध्ये जमा होतायत पैसे, पण का?

सोर्स : Google

सोर्स : Google

काही रेड इट युजर्सच्या गुगल पे अकाउंटवर अचानक 1,072 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 88,000 रुपये जमा झाल्याचं समोर आलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 एप्रिल : ऑनलाइन व्यवहाराकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. स्मार्टफोनमुळे अगदी एका क्लिकवर आर्थिक स्वरुपाची देवाण-घेवाण करता येते. ऑनलाइन व्यवहारास मिळणारी पसंती बघता वेगवेगळ्या कंपन्यांनी मोबाईल अ‍ॅप्स उपलब्ध करून दिले आहेत.या अ‍ॅप्सच्या मदतीनं तुम्ही शॉपिंग, बिलं भरणं, पैशाची देवाणघेवाण करणे आदी गोष्टी करू शकतं. ऑनलाइन व्यवहारासाठी गुगलचे जीपे अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या मोठी आहे. मात्र जीपेनं काही युजर्सला नुकताच एक सुखद धक्का दिला आहे. काही रेड इट युजर्सच्या गुगल पे अकाउंटवर अचानक 1,072 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 88,000 रुपये जमा झाल्याचं समोर आलं आहे. अचानक पैसे जमा होण्यामागे काय कारण असावं? हे अद्याप अस्पष्ट आहे. हा सर्व प्रकार नेमका काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.

    News18लोकमत
    News18लोकमत

    अनेक रेड इट युजर्सच्या गुगल पे अकाउंटमध्ये अचानक पैसे जमा झाले आहे. काही अकाउंट्समध्ये 1,072 अमेरिकी डॉलर म्हणजेच अंदाजे 88,000 रुपये जमा झाले आहेत. असे पैसे किती युजर्सच्या गुगल पे अकाउंटमध्ये जमा झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काहींच्या अकाउंट थोडीफार रक्कम जमा झाली आहे तर काहींना त्यांच्या खात्यावर 1000 अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त रक्कम असल्याचं दिसत आहे. गुगलने अशी अचानक रक्कम का जमा केली हे देखील स्पष्ट झालेलं नाही. तसेच ही समस्या गुगल पिक्सल युजर्सपुरतीच मर्यादित आहे की इतर अँड्रॉईड डिव्हाईसमध्येही अशी रक्कम जमा झाली आहे, हे अज्ञात आहे. जर तुम्ही गुगल पे अकाउंटवर रक्कम जमा झालेल्या भाग्यवान पिक्सल युजर्सपैकी असाल तर ही रक्कम तशीच ठेवायची किंवा त्या रकमेचं काय करायचं, याबाबतही स्पष्टता नाही. या समस्येकडं बघता गुगलच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला जर पेमेंट परत करता येत नसेल तर तुम्ही ही रक्कम तशीच ठेवू शकता. फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय याबाबत गुगलने अशा पद्धतीनं रक्कम मिळालेल्या युजर्सला कळवलं आहे की अशा पद्धतीनं रक्कम झालेल्या युजर्सनं पेमेंट परत करण्याचा प्रयत्न करावा. पण जर पेमेंट परत करता येत नसेल तर त्यांनी गुगल पे अकाउंटमध्ये जमा झालेली रक्कम तशीच ठेवावी. दरम्यान, हा गुगलचा `डॉग फूडिंग`चा प्रकार असल्याचं गुगल पिक्सेल सब रेडइटच्या युजर्सला कळवलं गेलं आहे. जेव्हा एखाद्या कंपनीचे कर्मचारी नवीन फिचर किंवा सुविधा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यापूर्वी जी चाचणी घेतात त्याला डॉगफूडिंग असं म्हटलं जातं. गुगलने चाचणीसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसे पाठवण्याऐवजी चुकून काही रँडम युजर्सच्या अकाउंट पैसा जमा केले आहेत, असं यावरून दिसतं. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचं दिसून येते. अशा प्रकारे गुगल पे अकाउंटवर रक्कम जमा झाल्याचं लक्षात येताच काही युजर्सनं ईमेलद्वारे गुगल संपर्क देखील साधला आहे. एकूणच गुगल पे अकाउंटवर अचानक रक्कम जमा झाल्याने काही युजर्सला आश्चर्याचा धक्का बसला असून, हे नेमकं कसं घडलं याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात