जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Personal loan : फक्त 30 सेकंदात Flipkart वर मिळणार Personal Loan, 5 लाखांपर्यंतची सुविधा

Personal loan : फक्त 30 सेकंदात Flipkart वर मिळणार Personal Loan, 5 लाखांपर्यंतची सुविधा

फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट

अनेक तांत्रिक कारणं किंवा त्रुटींमुळे लोन बँकांमुळे दिलं जात नाही. आता तुम्ही खरेदीसोबत लोन घेऊ शकता. ही सुविधा तुम्हाला फ्लिपकार्ट देत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : वाढती महागाई आणि वाढलेल्या गरजा पाहता सध्या लोकांना Loan घेण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे तरुणाई आपले शौक पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणहून लोक घेण्याच्या मागे आहे. मात्र अनेक तांत्रिक कारणं किंवा त्रुटींमुळे लोन बँकांमुळे दिलं जात नाही. आता तुम्ही खरेदीसोबत लोन घेऊ शकता. ही सुविधा तुम्हाला फ्लिपकार्ट देत आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आता पर्सनल लोनही देणार आहे. आपल्या 45 कोटी ग्राहकांसाठी खास ही सेवा देणार आहे. या नव्या सेवेचा ग्राहकांसोबतच कंपनीला मोठा फायदा होईल असा विश्वास आहे. Flipkart ने Axis Bank Limited सोबत भागीदारीत केली आहे. फ्लिपकार्ड वैयक्तिक कर्ज देत आहे.

Home Loan EMI: एका बँकेने स्वस्त केलं कर्ज, तर दुसरीने वाढवला इंटरेस्ट रेट; चेक करा EMI डिटेल्स फ्लिपकार्टने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ते आपल्या नवीन सेवेमध्ये डिजिटल कर्ज ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये, ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. लोन फेडण्यासाठीची मुदत ही लवचिक असेल आणि ती ग्राहकांना निवडण्याचं स्वातंत्र्यही असणार आहे. ग्राहक 6 ते 36 महिन्यांपर्यंत लोन फेडू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

बेंगळुरूस्थित ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना आधीच ‘बाय नाऊ पे लेटर’, ईएमआय आणि अनेक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुविधा देते. PhonePe सध्या कर्ज देतं पण ही सेवा सगळ्यांसाठीच उपलब्ध नाही. मात्र फ्लिपकार्टवर तुम्हाला लॉगइन करुन ही सेवा घेता येणार आहे.

जाहिरात

CIBIL स्कोअर सुधारायचाय? हे अ‍ॅप्स करतील मदत, प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये आहेत उपलब्ध! 2007 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, फ्लिपकार्ट हेल्थ+ आणि क्लियरट्रिप यासह जागतिक बाजारपेठ काबिज करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, PhonePe अधिकृतपणे फ्लिपकार्ट समूहापासून वेगळं झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात