मराठी बातम्या /बातम्या /मनी /कमी गुंतवणूक अन् लाखो रुपये नफा; मोत्याच्या शेतीसाठी सरकारही देतंय अनुदान

कमी गुंतवणूक अन् लाखो रुपये नफा; मोत्याच्या शेतीसाठी सरकारही देतंय अनुदान

एक मोती तयार होण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका शिंपल्यातून दोन मोती तयार होतात. एका मोत्याला (Pearl) कमीत कमी 120 रुपये दर मिळतो

एक मोती तयार होण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका शिंपल्यातून दोन मोती तयार होतात. एका मोत्याला (Pearl) कमीत कमी 120 रुपये दर मिळतो

एक मोती तयार होण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका शिंपल्यातून दोन मोती तयार होतात. एका मोत्याला (Pearl) कमीत कमी 120 रुपये दर मिळतो

    नवी दिल्ली 06 सप्टेंबर : कोरोनाच्या कालखंडात अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्या गेल्या, व्यवसायाचं उत्पन्न घटलं. त्यामुळे अनेकांना उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधावे लागले. काही जणांनी या कठीण काळाला संधी समजून नवा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. तुम्हीही फार मोठी गुंतवणूक न करता एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का? मग मोत्यांची शेती हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यात सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत अनुदानही मिळतं. त्यामुळे मोत्यांची शेती करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढीला लागली आहे. अनेक जण मोत्यांच्या शेतीतून लखपती बनले आहेत. मोत्यांच्या शेतीबद्दलची प्राथमिक माहिती मनी कंट्रोल डॉट कॉमने प्रसिद्ध केली आहे.

    मोत्यांच्या शेतीबद्दल जाणून घेण्याआधी थोडं मोत्यांबद्दल जाणून घेऊ. मोत्यांचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन भारतीय व चिनी वाङ्‌मयात मोत्यांचा उल्लेख आढळतो. भारतात आर्यांचा प्रवेश होण्यापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व १५०० वर्षांपूर्वी व ग्रीक संस्कृतीत ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपूर्वी मोत्यांचा उल्लेख आढळतो. मॅसिडोनियाची सत्ता असताना इराणच्या आखातातून उत्तम मोती काढले जात असत. रोमच्या साम्राज्यातही मोत्यांना पुष्कळ महत्त्व होते. या साम्राज्यात काही उच्चपदस्थ अधिकारीच मोती वापरू शकत असत. राजघराण्यातल्या व्यक्तींचे अलंकार व राजचिन्हे यांसाठी मोत्यांचा सर्रास वापर होत असे, अशी माहिती विश्वकोशात दिली आहे.

    दररोज फक्त 70 रुपये गुंतवून काही वर्षांतच बना लखपती; पोस्ट ऑफिसची बचत योजना

    मोत्यांच्या शेतीसाठी एक तलाव (Pond), मोत्यांचं बीज आणि योग्य प्रशिक्षण (Training) यांची गरज असते. तलाव आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने खोदू शकतो किंवा त्यासाठी सरकार 50 टक्के अनुदान (Subsidy) देतं, त्याचाही लाभ घेता येऊ शकतो. मोत्यांसाठी आवश्यक शिंपले (Oysters) अनेक राज्यांत मिळतात. दक्षिण भारतात (South India) आणि बिहारमधल्या दरभंगा (Darbhanga) इथल्या शिंपल्यांचा दर्जा चांगला असतो. मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था देशात आहेत. मध्य प्रदेशात होशंगाबाद (Hoshangabad) इथे आणि मुंबईतही (Mumbai) मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण (Pearl Farming) देणाऱ्या संस्था आहेत.

    मोत्यांची शेती कशी करायची?

    सगळ्यात आधी शिंपले एका जाळीत बांधून 10 ते 15 दिवसांसाठी तलावात टाकले जातात. ते स्वतःसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. त्यानंतर त्यांना बाहेर काढून त्यांची छोटीशी सर्जरी केली जाते. म्हणजे शिंपल्यांचं तोंड उघडून त्यात वाळूचा एक कण टाकला जातो. त्यावर शिंपल्यातला जीव स्रावांची अनेक आवरणं तयार करतो. त्यातूनच पुढे मोती तयार होत जातो.

    वाह रे पठ्ठ्या! कंपनीनं क्रेडिट कार्ड देण्यास दिला नकार तर सुरु केली कंपनी

    एक मोती तयार होण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका शिंपल्यातून दोन मोती तयार होतात. एका मोत्याला (Pearl) कमीत कमी 120 रुपये दर मिळतो. दर्जा चांगला असेल, तर 200 रुपयांहूनही अधिक किंमत एका मोत्याला मिळू शकते. एक एकर क्षेत्रावरच्या तलावात 25 हजार शिंपले टाकलेले असतील, तर त्यासाठी आठ लाख रुपये खर्च येईल. त्यातले 50 टक्क्यांहून अधिक शिंपले सुरक्षित पद्धतीने हाती लागतील. म्हणजेच 25 हजार मोत्यांचं उत्पादन झालं, तर कमीत कमी 120 रुपयांप्रमाणे वर्षाला साधारणतः 30 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळू शकतं. आठ लाख रुपये खर्च वजा जाता 20 ते 22 लाख रुपये नफा होऊ शकतो.

    First published:
    top videos