मुंबई, 20 मार्च : तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्याकडे पीपीएफ खाते असेल तर तुम्हाला चालू आर्थिक वर्षाच्या शेवची मोठी रक्कम मिळणार आहे. 31 मार्च रोजी तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. पीपीएफ खातेधारकांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा करण्यात आली आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आता सरकारकडून मोठा फायदा मिळणार आहे. यावेळी तुम्हाला या योजनेत 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ देखील मिळणार आहे. येत्या ३१ मार्चला तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.
३१ मार्च रोजी खात्यात येणार पैसे
अर्थ मंत्रालयाकडून दरवर्षी व्याजदर निश्चित केले जातात आणि 31 मार्च रोजी निश्चित केलेले व्याज खातेदारांच्या खात्यात जमा केले जाते. यंदा देखील ३१ मार्च रोजी सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. हे लक्षात घ्या की व्याज दर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला मोजला जातो.
500 रुपयांपासून करू शकती गुंतवणूक
या योजनेत एक व्यक्ती 500 रुपयांपासून सुरुवात करू शकते. तसेच एका आर्थिक वर्षात तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. एवढंच नाही तर पीपीएफमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीनंतर कर्ज आणि अंशक रक्कम काढण्याची सुविधाही मिळते.
कर सवलतीचा लाभ मिळतो
याशिवाय तुम्हाला पीपीएफवर कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये मिळणारे व्याज आणि मुदतपूर्ती पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. पीपीएफमध्ये किमान 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. परंतु तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्ही ते 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच काढू शकता. पीपीएफ खात्यात आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचा लाभ 7 व्या आर्थिक वर्षापासून घेतली जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.