मुंबई : सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. त्याच दरम्यान सोन्याची तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. नुकतेच 48 तासांपूर्वी केरळमधून सोन्याची तस्करी करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या असल्याची घटना ताजी असताना पुन्हाएकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या दोन आरोपींनी सोनं अशापद्धतीने लपवलं होतं की पाहून पोलीसही चक्रावले. त्यांनी आरोपींकडून 56 लाख रुपयांचं सोनं जप्त केलं. साधारण हे सोनं 956 ग्रॅम असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना सोन्याच्या तस्करीची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी जयपूर विमानतळावर ही कारवाई केली आहे.
तुमच्याकडील दागिने बनावट होलमार्किंगचे तर नाहीत? कसं ओळखायचं पाहा PHOTO
जयपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवाईत 55 लाख 92 हजार रुपयांचे सोने जप्त केलं. एका आरोपीने आपल्या पेंटमध्ये तर दुसऱ्याने अंतर्वस्त्रात सोनं लपवून ठेवलं होतं. दोन वेगवेगळ्या कारवाईत आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात जयपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाला यश आलं आहे.
पँटमध्ये सोनं लपवलेल्या आरोपीकडून 380 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं. तर दुसऱ्या व्यक्तीकडून 576 ग्रॅम सोनं आणलं. या दोघांनाही कारागृहात पाठवण्यात आलं असून कोर्टात हजर केलं जाणार आहे. केरळमधील घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटनं कोची विमानतळावर एका प्रवाशाकडून 85 लाख रुपये किमतीचे 1 हजार 979 ग्रॅम सोनं जप्त केलंय. अब्दुल असं या प्रवाशाचे नाव असून तो मूळचा मलप्पुरमचा रहिवासी असल्याची माहिती आहे. पायाला सेलोटेपच्या मदतीनं त्यानं हे सोनं लपवून आणलं होतं. अब्दुल याला अटक करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.