सोन्याचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस फसवणूक होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी सरकारने होमार्क बंधनकारक केलं.
मात्र आता होलमार्कमध्ये देखील बनावट आणि फसवणूक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तुमच्याकडे असलेले दागिने बनावट होलमार्कचे नाहीत ना हे आताच तपासून पाहा
ज्वेलर्स आपल्या ग्राहकांना कमी शुद्धतेचे सोन्याचे दागिने जास्त शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत विकतात. त्यामुळे तुम्ही या जाळ्यात अडकू नये म्हणून काळजी घ्या. त्यासाठी तुम्हाला होलमार्क कसा ओळखायचं हे माहिती असायला हवं.
गोल्ड हॉलमार्किंग ही एक प्रकारची गॅरंटी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांवर त्याच्या चिन्हाद्वारे शुद्धतेची हमी देतं.दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर त्याचा अर्थ त्याची शुद्धता प्रमाणित आहे.
कसं ओळखायचं - होलमार्कमध्ये चार चिन्ह दिलेली असतात. ही चारही चिन्हापैकी एकजरी नसेल तरी समजायचं की या सोन्यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने घेताना चारही चिन्हं असणं आवश्यक आहेत.
भारतीय मानक ब्युरोचा मार्क असणं आवश्यक आहे. याशिवाय सोनं किती कॅरेटचं आहे त्याचे मार्किंग असणं आवश्यक आहे. होलमार्किंग सेंटर कुठलं आहे याची ओळख त्यावर असणं आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येक ज्वेलरला एक विशिष्ट कोड दिलेला असतो तर तो कोड देखील असणं गरजेचं आहे.
सोनं किती कॅरेटचं आहे आणि त्याची शुद्धता ओळखण्यासाठी तुम्हाला 24, 22, 18 आणि 14 कॅरेटमधील फरक माहिती हवा. 24 कॅरेट शुद्धतेचं सोनं हे 999 मध्ये असतं. 91.60 म्हणजे 22 कॅरेट, 75 म्हणजे 18 कॅरेट आणि 58.50 म्हणजे 14 कॅरेट समजलं जातं. दागिने हे नेहमी होलमार्कमध्येच घ्यावेत आणि शुद्धता तपासून घ्यावेत.
२४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. पण त्याचे दागिने बनवले जात नाहीत. गुंतवणूक म्हणून या सोन्याकडे पाहिलं जातं. बहुतांश दागिन्यांसाठी २२, 20 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.