Home /News /money /

लग्नसराईच्या काळात पुन्हा वाढत आहेत सोन्याचे दर, Gold Investment करुन कशी कराल भरभक्कम कमाई?

लग्नसराईच्या काळात पुन्हा वाढत आहेत सोन्याचे दर, Gold Investment करुन कशी कराल भरभक्कम कमाई?

एका आठवड्यापासून सोन्याचा (Gold Rate Today) भाव चढता आहे. अमेरिकेतील प्रोत्साहन पॅकेजबाबत आशा वाढल्याने सोन्याला झळाळी आली आहे.

    नवी दिल्ली, 05 डिसेंबर: गेल्या एक आठवड्यादरम्यान सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold and Silver Rates) तेजी पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरस व्हॅक्सिनबाबत (Coronavirus Vaccine) आलेल्या बातम्यानंतर अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की या मौल्यवान धातूंची झळाळी कमी होईल. मात्र अमेरिकन प्रोत्साहन पॅकेज (US Stimulus Package) ची आशा वाढल्याने आणि इतर चलनांच्या तुलनेत डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्यामध्ये तेजी आली आहे. अमेरिकेत महागाईचा वाढता धोकाही आहे, यामुळे देखील गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव तेजीत आहेत. सोन्याच्या दराची काय आहे स्थिती? एका आठवड्यापासून सोन्याचा भाव चढता आहे. अमेरिकेतील प्रोत्साहन पॅकेजबाबत आशा वाढल्याने सोन्याला झळाळी आली आहे. अमेरिकेत जवळपास 908 अब्ज डॉलरच्या पॅकेजला सहमती मिळण्याची शक्यता आहे. मात्र पॅकेज आल्यानंतर महागाई वाढेल अशी आणखी एक शक्यता असल्याने हेजिंग होत आहे. डॉलरमधील कमजोरीमुळे सोन्याला सपोर्ट मिळतो आहे. कोरोना व्हायरस व्हॅक्सिनबाबत येणाऱ्या चांगल्या बातम्यांनंतरही सोन्यामध्ये तेजी आहे. पुढील आठवड्यापासून UK मध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. चांदीची काय स्थिती? सोन्याबरोबरच चांदीलाही झळाळी आली आहे. MCX वर गेल्या एका आठवड्यापासून चांदीचे दर उच्च स्तरावर आहेत. एका आठवड्यात MCX वर चांदीचे दर 6 टक्क्यांनी वाढले आहेत. डॉलरमधील कमजोरीमुळे चांदीला सपोर्ट मिळत आहे. चांदीची औद्योगिक मागणी देखील वाढत आहे. अमेरिकन प्रोत्साहन पॅकेजबाबत आशा वाढल्याने चांदीलाही सपोर्ट मिळतो आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर दुप्पट लाभ सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक महागाई काळातील सुरक्षा कवच असते. अनिश्चित परिस्थितीत सोन्यातून एक उत्तम रिटर्न मिळतो. सोन्यामध्ये तुम्ही दागिने, नाणी किंवा बिस्किटं, गोल्ड ETF, गोल्ड बाँड, गोल्ड फ्यूचर्स या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. या LIC च्या योजनेत करा गुंतवणूक, एकदाच हप्ता भरल्यानंतर दरमहा मिळतील 14000 फिजिकल गोल्ड दागिन्यांमध्ये गुंतवणूक हा सोन्यातील गुंतवणुकीचा सर्वात जुना पर्याय आहे. सुरुवातीच्या काळात हा पर्याय सर्वात बेस्ट पर्याय होता. किंवा सोन्याच्या नाण्यात गुंतवणूक केली जात असे. तुम्ही सराफाकडून आता ऑनलाइन गोल्ड देखील खरेदी करू शकता. अशाप्रकारे सोने खरेदी करताना सोन्याची शुद्धता आणि हॉलमार्किंगवर लक्ष द्या. बिलामध्ये शुद्धता आणि किंमत लिहिलेली आहे की नाही, हे अवश्य तपासा. सोन्याची किंमत कॅरेटनुसार निश्चित होते. त्यामुळे कॅरेट, मेकिंग चार्ज या गोष्टी व्यवस्थित तपासून सोनेखरेदी करा. गोल्ड ETF 1 गोल्ड ईटीएफ 1 ग्रॅम सोनं असतं. यामध्ये भेसळीची चिंता नसते. तुम्ही हे एक्सचेंजमधून खरेदी करू शकता. गोल्ड ETF हे NSE, BSE वर कॅश सेगमेंटमध्ये लिस्टेड असतं. तुम्ही याची खरेदी डिमॅट खाते किंवा ब्रोकरच्या माध्यमातून करू शकता. यामध्ये ऑनलाइन किंमत ट्रॅक करण्याची सुविधा असते. हे तुम्ही संपूर्ण भारतात कुठेही खरेदी किंवा विक्री करू शकता. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 11 डिसेंबरआधी करा हे काम अन्यथा... सॉव्हरेन गोल्ड यामध्ये देखील भेसळीची भीती नसते. सॉव्हरेन गोल्ड बाँड ही योजना सरकारी आहे. सरकारच्या निर्देशावरून RBI यांची विक्री करते. यामध्ये सरकारकडून स्वस्त सोनेखरेदीची संधी मिळते. बँक. एक्सचेंज, पोस्ट ऑफिस इ. मधून तुम्ही हे बाँड खरेदी करू शकता. यामध्ये कमीत कमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलोची गुंतवणूक करता येते. 2015 मध्ये ही योजना लाँच करण्यात आली होती. यामध्ये तुम्हाला 2.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल. तर SGB चा मॅच्यूरिटी पीरिएड आठ वर्षांचा असतो.
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या