कमी पैशात मोठी कमाई देणारा बिझनेस; महिन्याला कमवा एक लाखांपर्यंत रक्कम

असा व्यवसाय सुरू करणं फायदेशीर ठरेल, ज्यात डिमांड अधिक आणि फायदाही अधिक होईल. सध्या मार्केट कंडिशन पाहता, टिश्यू पेपरचा व्यवसाय करता येऊ शकतो.

असा व्यवसाय सुरू करणं फायदेशीर ठरेल, ज्यात डिमांड अधिक आणि फायदाही अधिक होईल. सध्या मार्केट कंडिशन पाहता, टिश्यू पेपरचा व्यवसाय करता येऊ शकतो.

  • Share this:
    नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : देशभरातील संकटाच्या काळात तुम्ही काही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर असा व्यवसाय सुरू करणं फायदेशीर ठरेल, ज्यात डिमांड अधिक आणि फायदाही अधिक होईल. सध्या मार्केट कंडिशन पाहता, टिश्यू पेपरचा व्यवसाय करता येऊ शकतो. घर, ऑफिस, रेस्टोरेंटपासून छोट्या दुकानांमध्येही टिश्यू पेपरचा वापर होतो. त्यामुळे हा बिझनेस करणं फायद्याचं ठरू शकतं. किती करावी लागेल गुंतवणूक - हा बिझनेस सुरू करण्यासाठी 3.50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. बँकेत मुद्रा स्किमअंतर्गत लोनसाठी अप्लाय करता येऊ शकतं. लोनसाठी अप्लाय केल्यास, टर्म लोनसाठी जवळपास 3 लाख 10 हजार रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 5.30 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. मशिनरी आणि मटेरियल - लोननंतर मशिनरीसाठी जवळपास 4.40 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्यासाठी रॉ मटेरियल जवळपास 7.13 लाख रुपये खर्च करावे लागतील. या व्यवसायासाठी जागा असणं गरजेचं आहे. लायसन्स - बिझनेस रजिस्टर्ड होणं आवश्यक आहे. त्याशिवाय ट्रेड लायसन्स, पॉल्यूशन कंट्रोल बोर्डकडून एनओसी सर्टिफिकेट, फॅक्ट्रीसाठी लायसन्स गरजेचं आहे. एमएसएमई नोंदणी आणि निर्यातीसाठी आयईसी क्रमांक काढावा लागेल. किती होईल कमाई - सध्याच्या मार्केट परिस्थितीनुसार, हा बिझनेस कमाई देणारा आहे. या व्यवसायात एका वर्षात 1.50 लाख किलोग्रॅम पेपर नॅपकिनचं प्रोडक्शन करता येतं. याची बाजारात किंमत 65 रुपये प्रति किलोपर्यंत आहे. त्यानुसार, वार्षिक टर्नओवर जवळपास 97.50 लाख रुपये होईल. संपूर्ण खर्च निघाल्यावर वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांपर्यंतची बचत होईल. पॅकेजिंग - टिश्यू पेपर बनल्यानंतर पॅकेजिंगवर खास लक्ष द्याव लागेल. पॅकेजिंगसाठी रजिस्टर्ड टॅग आणि ट्रेडमार्कचा वापर करू शकता. त्याशिवाय ट्रेड मार्क छापलेल्या प्लास्टिकचं पॅकेट तयार करून त्यात 50 ते 100 टिश्यू पेपर टाकता येतात. मुद्रा योजनेंतर्गत अर्ज - या व्यवसायासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत अर्ज करू शकता. त्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. त्यात संपूर्ण डिटेल्स नाव, पत्ता, बिझनेस पत्ता, एज्युकेशन, चालू इनकम आणि किती कर्ज हवं ते भरावं लागेल. यासाठी प्रोसेसिंग फी किंवा गॅरेंटी फी द्यावी लागत नाही.
    Published by:Karishma Bhurke
    First published: