नवी दिल्ली, 29 जानेवारी: भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्याच्या साप्ताहिक किंमतींमध्ये वाढ झाली आहे. तर चांदीचे दर हे कमी झाले आहेत. या व्यावसायिक सप्ताहात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 145 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर चांदीच्या दरामध्ये 81 रुपयांनी अगदी किरकोळ घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, गेल्या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 23 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर 57,044 होता. जो शुक्रवार पर्यंत वाढून 57,189 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 68,273 रुपयांवरून 68,192 रुपये प्रति किलोवर आली आहे.
IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित दराविषयी माहिती देतात. या सर्व किमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य आहेत परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
23 जानेवारी - 57,044 रुपये प्रति 10 ग्रॅम
24 जानेवारी - 57,322 रुपये प्रति 10 ग्रॅम
25 जानेवारी - रु 57,138 प्रति 10 ग्रॅम
26 जानेवारी - मार्केट हॉलिडे
27 जानेवारी - 57,189 रुपये प्रति 10 ग्रॅम
23 जानेवारी 2022 - रुपये 68,273 प्रति किलो
24 जानेवारी 2022 - रुपये 68,137 प्रति किलो
25 जानेवारी 2022 - रुपये 67,894 प्रति किलो
26 जानेवारी 2022 - मार्केट हॉलिडे
27 जानेवारी 2022 - रुपये 68,192 प्रति किलो
तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव यंदा 64 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. सोन्याचा सध्याचा ट्रेंड बघितला तर लवकरच सोने या लेव्हलवर जाऊ शकते. केडिया अॅडव्हायझरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की, सोन्याच्या भावांमध्ये यंदा तेजी राहू शकते. सेंट्रल बँकेने सोने खरेदी केल्याने त्याचा पॉझिटिव्ह परिणाम सोन्यावर दिसून येईल. केडिया म्हणाले की 2023 मध्ये सोने 64 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold price