Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज तेजी, चांदीही महागली; तेजीचं काय आहे कारण?

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज तेजी, चांदीही महागली; तेजीचं काय आहे कारण?

सोन्याचा वायदा भाव पुन्हा एकदा 51 हजारांच्या दिशेने जाताना दिसत आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत सकाळी 180 रुपयांनी वाढून 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

    मुंबई, 27 जून : अमेरिकेसह G7 देशांनी रशियाकडून (Sanctions on Russia) सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादल्यानंतर सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या किमती वाढल्याचं (Gold-Silver Price Increased Today) दिसून आलं. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 51021 रुपये आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 50829 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 192 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे. सोनं उच्चांकी किमतीपेक्षा 5000 हजारांनी स्वस्त यानंतरही, सोन्याचा दर (Gold Price) आजही 5,179 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. चांदीही महागली आज चांदीचा दर (Silver Price) 60507 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 59350 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर प्रतिकिलो 1157 रुपयांच्या वाढीसह उघडला आहे. Nepal Bans Pani Puri: नेपाळमध्ये पाणीपुरी विक्रीवर बंदी, काय आहे संपूर्ण प्रकरण? जागतिक बाजारातही तेजी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,835.57 डॉलर प्रति औंस होती, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.21 टक्के जास्त आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत 21.39 डॉलर प्रति औंसवर पोहोचली, जी मागील बंद किंमतीपेक्षा 1.17 टक्के जास्त आहे. इतर मौल्यवान धातूंमध्ये, प्लॅटिनमची स्पॉट किंमत 0.5 टक्क्यांनी वाढून 912 डॉलर प्रति औंस झाली, तर पॅलेडियमची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढून 1,886.65 डॉलरवर पोहोचली. IKEA स्टोअर बाहेर जमलेली गर्दी पाहून व्हाल थक्क! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल काही काळ किमती वाढतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जी 7 देशांनी रशियाच्या सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादल्यामुळे त्याच्या किमती काही काळ वाढू शकतात. पाश्चात्य देशांनी रशियाकडून कोणत्याही प्रकारच्या आयातीवर आधीच निर्बंध लादले आहेत आणि सोन्यावरील निर्बंधांचा फारसा परिणाम होणार नाही, परंतु काही काळ जागतिक बाजारावर नक्कीच परिणाम होईल, ज्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही होऊ शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या