• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today : सोनं आज पुन्हा महागलं; काय आहेत नवे दर?

Gold Price Today : सोनं आज पुन्हा महागलं; काय आहेत नवे दर?

Gold Rate Today, सोन्याची किंमत आज 46,841 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होती. चांदीचा (Silver rate) भाव 64,899 रुपयांवर होता.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : सणासुदीचे आणि लग्नसराईचे दिवस आल्याने येत्या काही दिवसात सोन्याच्या (GOld Rate today) विक्रीत वाढ होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. दिल्लीत सोमवारी सोन्याच्या किंमतीत 182 रुपयांनी वाढ झाली आहे. आजच्या या वाढीसह सोनं आज 47 हजार 023 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण हे या वाढीचं कारण असल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितलं आहे. मागील ट्रेडमध्ये सोन्याची किंमत 46,841 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होती. आज चांदीचा (Silver rate today)भाव 178 रुपयांनी घसरून 64,721 रुपये किलो झाला. मागील व्यवहारात चांदीचा भाव 64,899 रुपयांवर होता. सोमवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 18 पैशांनी घसरून 75.08 वर आला. सोन्याच्या किमतीत वाढ का झाली? एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनियर अॅनालिटिक्स तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी कॉमेक्सवर सोन्याच्या किमती 0.40 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होत्या. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच सध्या सुरू असलेल्या किमती 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. चांदीचा विचार केला तर त्यातही मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत किंवा वर्षअखेरीस चांदीचे भाव 76,000 ते 82,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत जातील, असे बहुतांश व्यापाऱ्यांचे मत आहे. Rakesh Jhunjhunwala यांची 'या' रियल्टी स्टॉकमध्ये गुंतवणूक, वर्षभरात 225 टक्क्यांचे रिटर्न्स Sovereign Gold Bond: स्वस्त सोनेखरेदीची मोदी सरकारची स्कीम, 25 ऑक्टोबर 2021 पासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची सातवी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series-VII) सुरू होत आहे. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (25 ते 29 ऑक्टोबर) खुली असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केला जातो. 'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी कधी जारी होणार गोल्ड बाँड? अर्थ मंत्रालयाच्या मते, 2021-22 गोल्ड बाँड्सच्या सीरिजअंतर्गत, ऑक्टोबर 2021 आणि मार्च 2022 दरम्यान चार टप्प्यांत बाँड जारी केले जातील. या सीरिडअंतर्गत मे 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत सहा टप्प्यांत बॉण्ड जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की 2021-22 सीरिज- VII साठी सबस्क्रिप्शन कालावधी 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत असेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बाँड जारी केले जातील. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 च्या सातव्या सीरिजची इश्यू प्राइस 4,765 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: