नवी दिल्ली, 16 जून: सोन्याचांदीच्या दरात (Gold-Silver Rate) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. विदेशी बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर (Gold Market) झाला आहे.
दरम्यान आज मात्र सोन्याच्या दरात (Gold Price Today) किरकोळ वाढ झाली आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 36 रुपयांच्या किरकोळ तेजीमुळे 48,460 रुपये प्रति तोळा झाली आहे.
दरम्यान चांदीची वायदे किंमत 227 रुपयांनी अर्थात 0.32 टक्क्याच्या तेजीमुळे 71,475 रुपये प्रति किलो झाली आहे.
एका महिन्याच्या निचांकी पातळीवर सोन्याचे दर- MCX वर सोन्याचे दर 0.11 टक्क्यांनी वाढून 48,476 रुपये प्रति तोळा झाले आहेत, जे गेल्या एका महिन्यातील निचांकी पातळीच्या जवळपास आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे दर?- आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याचे दर चार आठवड्यातील निचांकी पातळीच्या जवळपास पोहोचले आहेत. स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्क्यांच्या घसरणीनंतर दर 1,855.12 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीच्या दरात 0.1 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर दर 27.62 डॉलर प्रति औंसवर आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर सध्या 1850 डॉलरच्या आसपास राहतील. जरी कमी झाले तर दर 1,800 डॉलरपर्यंत जाऊ शकतात.
काय आहेत तुमच्या शहरातील दर? -गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचे दर 47,600 रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर 71,500 रुपये प्रति किलो आहेत.
नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 47,650 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचे दर 45,760 रुपये प्रति तोळा आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,600 रुपये प्रति तोळा आहेत.
दरम्यान आता सोन्याचे दागिने आणि इतर कलाकृतींवर हॉलमार्किंग चरणबद्ध पद्धतीने अनिवार्य करण्यात आले आहे. एकूण 256 जिल्ह्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे.