नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: शनिवारी सोन्याच्या दरात (Gold Price Today) वाढ झाली आहे. तर चांदीचे दरही (Silver Price Today) आज वधारले आहेत. सोन्याचे दरात आज 70 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर 47 हजारांपार पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात आज 300 रुपयांची वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचांदीचे आजचे दर? (Gold and Silver Rates on 11th Sept 2021) सोन्याच्या दरात 70 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर 47,070 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 300 रुपयांनी वाढून 64,200 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार हे सोन्याचे दर आहेत. विविध शहरातील सोन्याचे भाव देशभरातील विविध शहरात सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 46,250 आणि 46,070 रुपये प्रति तोळा आहे. तर चेन्नईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 44,510 रुपये प्रति तोळा आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,450 रुपये प्रति तोळा आहे, मुंबईत 24 कॅरेटचा भाव 47,070 रुपये प्रति तोळा आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.