जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: काय आहेत आजचे सोन्याचे दर? आतापर्यंत 11500 रुपयांची घसरण

Gold Price Today: काय आहेत आजचे सोन्याचे दर? आतापर्यंत 11500 रुपयांची घसरण

Gold Price Today: काय आहेत आजचे सोन्याचे दर? आतापर्यंत 11500 रुपयांची घसरण

Gold Rates Today: आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर सोन्याचा भाव स्थीर आहे. सोन्याचे दर प्रति तोळा 44,897 रुपये आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 मार्च: लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात जर तुम्ही सोने (Gold price today) किंवा चांदी खरेदीचा (Silver Price Today)  विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर सोन्याचा भाव स्थीर आहे. सोन्याचे दर प्रति तोळा 44,897 रुपये आहेत. तर चांदीच्या किंमतीमध्ये आज 0.16 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर भाव  65140 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याशिवाय आधीच्या सत्रात सोन्याचांदीचे दर किरकोळ वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचांदीचे दर आज स्थीर आहेत. अमेरिकन बाजारात आज स्पॉट गोल्डची किंमत  1,734.81 डॉलर प्रति औंस आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्या काय आहे देशातील महानगरात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत. मुंबई (Gold Rates in Mumbai) आणि कोलकात्यामध्ये दर अनुक्रमे 45030 रुपये आणि  46880 रुपये प्रति तोळा आहेत. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव  48070 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 46150 रुपये आहे. (हे वाचा- आता आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळणार? काय म्हणाले केंद्रीय मंत्री संतोष गंगवार ) 11500 रुपयांना स्वस्त झाले दर गेल्यावर्षी सर्वोच्च स्तरावर सोन्याचे दर पोहोचल्यानंतर त्या तुलनेत आता दर 11500 रुपयांनी कमी झाले आहेत. पँडेमिकमध्ये (Coronavirus Pandemic) सोन्याचे दर 55 हजार रुपयांपेक्षा जास्त होते. तज्ज्ञांच्या मते लसीकरणाची (Coronavirus Vaccination) सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर कमी होत आहेत. कोरोना व्हॅक्सिनेशन सुरू झाल्यानंतर आर्थिक व्यवहारांनी तेजी पकडल्याने सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. असे असले तरी तज्ज्ञांचा असा देखील अंदाज आहे की यावर्षी सोन्याचे दर नवा रेकॉर्ड रचू शकतात. 2021 मध्ये सोन्याचे दर 63,000 रुपये स्तरावर जाऊ शकतात. असे झाल्यास गुंतवणुकदारांना चांगला नफा मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात