नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: सोन्याच्या दरांत (Gold Price Today on 16th February 2022) मंगळवारी (15 फेब्रुवारी 22) तेजी दिसून आली होती. त्यानंतर सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 50,000 रुपयांवर पोहोचल्याचं दिसून आलं. मात्र आज (बुधवारी) सोन्याच्या दरात 850 रुपयांनी घट झाली. खरं तर सोनं हा गुंतवणूकीसाठी (Investment in Gold) एक सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. अनेक लोक गुंतवणुकीसाठी सोन्याला प्रथम प्राधान्य देतात. अर्थात याचे फायदेदेखील अनेक आहेत. सध्या सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र आज, कमी झालेले सोन्याचे दर पाहता, ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची ही सुसंधी आहे. सध्या सोन्याच्या दरांत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात तेजी नोंदली गेली. त्यानंतर सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50,000 रुपयांवर नोंदला गेला. दुसरीकडे आज एकाच दिवसात सोन्याचा दर थेट 850 रुपयांनी खाली आला. तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज एक चांगली संधी आहे. मल्टिकमॉडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) आज सोन्याचे व्यवहार 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह होत आहेत. चांदीच्या (Silver Rate Today) दरांतही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे वाचा- होळीआधी या कर्मचाऱ्यांना मिळणार Good News? पगारात मिळणार एवढी वाढ सोनं-चांदीचे आजचे भाव एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांनी घसरून 49,350 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 62,892 रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घेऊ शकता सोन्याचा दर सोन्याचे ताजे दर तुम्ही अगदी घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमाकांवर मिस्ड कॉल (Gold rate on Missed Call) द्यावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. यात तुम्ही सोन्याचे ताजे दर तपासू शकता. या सुविधेमुळे सोन्याच्या दराचा अंदाज ग्राहकांना अगदी घरबसल्या घेता येतो. त्यामुळे ही सुविधा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरत आहे. हे वाचा- Investment Tips : PPF Account मॅच्युअर झाल्यानंतर तुमच्याकडे कोणते पर्याय असतात? या पद्धतीने तपासू शकता सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता (Purity of gold) तपासयची असेल तर, यासाठी सरकारने एक विशेष अॅप (APP) तयार केलं आहे. BIS Care App च्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून तु्म्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्याच्याशी संबंधित अन्य तक्रारीही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क (Hallmark) क्रमांक चुकीचा असल्याचं आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.