Home /News /money /

Good News! स्वस्त सोनंखरेदीची संधी; 2 दिवसांपासून घसरतायंत Gold Rates; तपासा आजचा भाव

Good News! स्वस्त सोनंखरेदीची संधी; 2 दिवसांपासून घसरतायंत Gold Rates; तपासा आजचा भाव

Gold Price: ग्राहकांना सध्या सोनं (Gold Price Today) खरेदी करण्याची चांगली संधी आहे. वास्तविक, गेल्या दोन दिवसांपासून सोनं-चांदीचे दर घसरत आहेत. काल (बुधवारी) सोन्याच्या दरात 0.25 टक्क्यांची घसरण झाली होती, तर आज (गुरूवारी) 0.07 टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: ग्राहकांना सध्या सोनं (Gold Price Today) खरेदी करण्याची चांगली संधी आहे. वास्तविक, गेल्या दोन दिवसांपासून सोनं-चांदीचे दर घसरत आहेत. काल (बुधवारी) सोन्याच्या दरात 0.25 टक्क्यांची घसरण झाली होती, तर आज (गुरूवारी) 0.07 टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे. यासोबतच आज (गुरुवारी) चांदीचा भाव (Silver Price Today) 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. जाणून घ्या काय आहे सोनं-चांदीची किंमत मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX), आज एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव (Gold Rate Today) 0.07 टक्क्यांनी घसरून 48,049 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.23 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव (Silver Rate Today) 61,362 रुपये आहे. 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात 'एमसीएक्स'वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर गेली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोनं 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. म्हणजेच अजूनही ते सुमारे 8400 रुपयांनी स्वस्त आहे. हे वाचा-हो आहे मी Risk Taker! तसं म्हटलं जाण्याचा आनंद आहे : निर्मला सीतारामन मिस्ड कॉल देत जाणून घ्या सोन्याचे दर सोन्याचे सध्याचे दर नेमके किती आहेत, हे तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल (Gold Rate on Missed Call) द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यात तुम्हाला सोन्याचे सर्वांत ताजे दर मिळतील. अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता (Purity of gold) जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासयची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप (App) तयार केलं आहे. BIS Care App च्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. ग्राहक या अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ सोन्याची शुद्धता जाणून घेऊ शकत नाहीत तर त्याच्याशी संबंधित कोणत्याही स्वरूपाची तक्रार करू शकतात. वस्तूचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचं आढळून आल्यास ग्राहक या अ‍ॅपच्या माध्यमातून त्याबाबत तत्काळ तक्रार दाखल करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतही तत्काळ माहिती मिळते. हे वाचा-डिजिटल चलन कधी येणार बाजारात? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं उत्तर भारतात साधारणपणे घरातील लग्नांसाठी कुटुंब सोनं खरेदी करतात. पैसे साठवून ठेवण्याची ही एक जुनी पद्धत आहे. त्यामुळे लोक सोनं किंवा चांदी खरेदी करतात. कोरोनाच्या काळातही सोन्याची खरेदी तुलनेने चांगली झाली होती. त्यामुळे सोन्याचांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सोन्याचे दर आणि त्याची शुद्धता तपासणारं अ‍ॅप दोन्हीही ग्राहकांना फायद्याचं ठरू शकतं.
First published:

Tags: Finance, Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Investment, Money, Multi exchange commodity

पुढील बातम्या