मुंबई, 31 जुलै : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा दर 51 हजारांच्या पुढे गेला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत दर झपाट्याने वाढले. सराफा बाजारात या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 29 जुलै रोजी सोन्याचा दर 51,623 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात वाढ झाली. पाच दिवसांच्या व्यापार सप्ताहात केवळ एकाच दिवशी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली होती, बाकीच्या दिवशी त्याचे भाव वधारले. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, या आठवड्यात सोमवारी 25 जुलै रोजी सोन्याचा दर 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मंगळवारीही वाढ झाली आणि तो 50,822 वर बंद झाला. बुधवारी दरात घसरण झाली सोन्याचा भाव 50,780 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला. गुरुवारी सोन्याचा दर वाढला आणि 51 हजारांच्या पार गेला. त्या दिवशी सोन्याचा दर 51,174 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. शुक्रवारी त्यात आणखी वाढ झाली आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 51,623 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. बँक ऑफ बडोदाकडून उद्यापासून महत्त्वाचा नियम लागू; ग्राहकांना काय करावं लागणार? सोनं किती रुपयांनी महागलं? गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 946 रुपयांनी वाढला आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 22 जुलै रोजी सोन्याचा दर 50,677 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. बऱ्याच कालावधीनंतर सोन्याचा दर 51 हजारांच्या पुढे गेला आहे. 6 लाखांची गुंतवणूक करून दरमहा कमवा 1 लाख रूपये, या व्यवसायात मिळेल भरपूर नफा कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.