मुंबई, 01 जानेवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या दिवशीच भारतीय सराफ बाजारात सोन्याने उच्चांकी दर गाठला आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. अर्थसंकल्पात सोन्यावर कोणतेही नवे कर आकारले नसले तरी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 52 हजार 900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 58 हजार 60 रुपये इतके आहेत. तर जीएसटी लागू होऊन हा दर 59728 रुपये इतका होतो. तर चांदीही प्रती किलोग्रॅमला 1123 रुपयांनी महाग झाली. प्रतिकिलो 68 हजार 450 रुपये इतकी चांदीची किंमत झालीय. तर जीएसटीसह 70256 रुपयांवर किंमत पोहचली आहे.
महिन्याभरापूर्वी जीएसटी वगळून २४ कॅरेट सोन्याचे दर ५५ हजार २०० प्रती दहा ग्रॅम इतके होते. आज ते ५७ हजार ८२० रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या खरेदीवर आरटीजीएस, जीएसटी, टीडीएस लागू होऊन हाच दर प्रति १० ग्रॅमला ५९ हजार ४९४ रुपयांवर जातो.
हेही वाचा : 5 लाख उत्पन्न असेल तर कोणता TAX Slab फायदेशीर?
सोन्याचा आंतरराष्ट्रीय बाजारात दर 1931.14 डॉलर प्रति औंस असा आहे. 1934 ते 1942 हा दर जाण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय बाजारातही सोन्याची किंमत वाढून ती 60 हजारांच्या वर जाऊ शकते. अर्थसंकल्पात आज आयात शुल्क कमी केल्यानंतरही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार येत्या काळात सोन्याचे दर 60 ते 64 हजार रुपयांवर पोहोचू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver prices today, Silver