जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सणासुदीला शेतकऱ्यांना मोठा फटका, MSP जाहीर करण्यासाठी उशीर

सणासुदीला शेतकऱ्यांना मोठा फटका, MSP जाहीर करण्यासाठी उशीर

सणासुदीला शेतकऱ्यांना मोठा फटका, MSP जाहीर करण्यासाठी उशीर

शेतकरी वाट बघतोय पण अजून MSP चा पत्ता नाही, कधी जाहीर होणार MSP? वाचा सविस्तर

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सप्टेंबर संपत आला असून रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी शेतकरीही तयारीला लागले आहेत. मात्र, सरकारने अद्याप रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केलेली नाही. नियमानुसार सरकारने पेरणी सुरू होण्याच्या एक महिना अगोदर एमएसपी जाहीर करायला हवा होता. सरकार सप्टेंबरमध्येच MSP जाहीर करते. गेल्या वर्षी गहू, मोहरी आणि इतर सर्व रब्बी पिकांसाठी 8 सप्टेंबरला MSP जाहीर करण्यात आला होता. 2020 मध्येही MSP सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. या महिन्यात सप्टेंबर उलटून गेला तरी MSP जाहीर करण्यात आला नाही. शेतकरी सरकार कधी MSP जाहीर करणार याकडे डोळे लावून बसलं आहे. यावेळी एमएसपीवर आधारित पेरणी सुरू होणार असल्याने सरकार एमएसपी जाहीर केली जाते. याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. पेरणीच्या एक महिना आधी एमएसपी जाहीर करण्याचा ट्रेंड 1968 पासून सुरू आहे असं माजी कृषी राज्यमंत्री सोमपाल शास्त्री म्हणाले. काही वर्षे वगळता, रब्बी पिकांसाठी एमएसपी साधारणपणे सप्टेंबर महिन्यात जाहीर केला जातो. MSP काय आहे? एमएसपी हा दर आहे, ज्या दराने सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी केली जाते आणि शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट मोजणीवर आधारित आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशींवर आधारित, कृषी आणि सहकार विभाग, भारत सरकार, त्यांच्या पेरणीच्या हंगामापूर्वी 22 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) घोषित करते. 1966-67 पहिल्यांदा याची भारतात सुरुवात झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: farmer
  • First Published :
जाहिरात
जाहिरात