नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : देशासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढू लागला आहे. भारतासह इतर देशातील स्थितीही आता पुन्हा चिंताजनक होऊ लागली आहे. कोरोना वॅक्सिनकडे सर्वाच्या नजरा असून अनेक देशात यावर काम सुरू आहे. याचदरम्यान, एका संशोधनामध्ये अशा ब्लड ग्रुपची (Blood Group) माहिती मिळाली आहे, ज्याला कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका सर्वात कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये मंगळवारी प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी दावा केला आहे की, टाईप ओ आणि आरएच-निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक कमी आहे. या शोधात 2,25,556 कॅनडाई लोकांना सामिल करण्यात आलं होतं. या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी ए, एबी, बी रक्तगटाकडून कोरोना व्हायरस पोझिटिव्ह होण्याचा धोका सुमारे 12 टक्के आणि गंभीर कोरोना आणि मृत्यूचा धोका सुमारे 13 टक्के असल्याचं आढळून आलं. या सर्वांचा ब्लड ग्रुप ओ होता. तसंच ज्या लोकांचा ब्लड ग्रुप आरएच-निगेटिव्ह आहे, त्यांचाही कोविड-19 पासून बचाव होईल, असा दावा करण्यात आला आहे. सर्वात कमी धोका ओ रक्तगट असलेल्या लोकांना असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
टोरंटोमधील सेंट मायकल रुग्णालयाचे डॉक्टर आणि संशोधक जोल रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी असू शकते. आता त्यांचा पुढील शोध याच अँटीबॉडीबाबत असणार आहे. या संशोधनासह असाही दावा केली आहे की, गंभीर कोविड-19 प्रकरणात व्हिटॅमिन डी पूर्णपणे अयशस्वी आहे.
व्हिटॅमिन डी आणि कोरोना व्हायरसबाबत अनेक दावे केले जात आहेत. या शोधात अशी बाब समोर आली की, शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास, कोरोनाचा धोका अधिक असल्याचं सांगितलं आहे. परंतु असंही आढळलं आहे की, व्हिटॅमिन डीचं अधिक प्रमाण असल्यासही कोरोनाचा धोका कमी होणार नाही.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.