जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सोन्याचा भाव उतरला! लगेच चेक करा 22 आणि 24 कॅरेटचे दर

सोन्याचा भाव उतरला! लगेच चेक करा 22 आणि 24 कॅरेटचे दर

सोन्याचे दर घसरले

सोन्याचे दर घसरले

लग्नासाठी सोनं खरेदी करताय गुडन्यूज, 22 कॅरेटचे दर लगेच चेक करा

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : लग्नसराईचे दिवस सुरू आहेत त्यामुळे सोनं खरेदी साठी लगबग वाढली आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. सोन्याचा भाव सराफ बाजारात उतरत आहे. त्यामुळे आता सोनं खरेदी करण्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरले आहेत. विदेशी बाजारातील सर्वात मोठे सोने चलन असलेल्या कॉमेक्सवर सोन्याचे दर 1780 डॉलर प्रति औंसवरून 1765 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. कॉमेक्सवर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. या संकेतांमुळे देशांतर्गत कमॉडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर सोन्यात मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवरची 10 ग्रॅम सोन्याची किंमत खाली उतरली आहे. १० ग्रॅमसाठी 53 हजार रुपये मोजावे लागत आहे. IBJA चा क्लोजिंग रेट - 999 शुद्धता असलेलं सोनं - 53,094 रुपये प्रति 10 ग्रॅम - 995 शुद्धता असलेलं सोनं - 52,881 रुपये प्रति 10 ग्रॅम - 916 शुद्धता असलेलं सोनं - 48,634 रुपये प्रति 10 ग्रॅम - 750 शुद्धता असलेलं सोनं - 39,821 रुपये प्रति 10 ग्रॅम - 585शुद्धता असलेलं सोनं - 31,060 रुपये प्रति 10 ग्रॅम - Silver- 62,594 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी मोजावे लागत आहेत.

मला गोल्ड लोन घ्यायचं असेल तर ते कसं मिळेल, काय करायचं?

इंडियन बुलियन मार्केटचे मुंबईतील दर 24 कॅरेट - एक ग्रॅम - 5,300, 10 ग्रॅमसाठी 53,000 22 कॅरेट - एक ग्रॅम - 4,858, 10 ग्रॅमसाठी 48,583 20 कॅरेट- एक ग्रॅम - 4,417, 10 ग्रॅमसाठी 44,167 18 कॅरेट - एक ग्रॅम - 3,975, 10 ग्रॅमसाठी 39,750 16 कॅरेट - एक ग्रॅम - 3,533, 10 ग्रॅमसाठी 35,333 14 कॅरेट - एक ग्रॅम - 3,092, 10 ग्रॅमसाठी 30,917 यामध्ये अजून प्रत्येक सराफ आले मेकिंग चार्ज देखील जोडतो. त्यामुळे हे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सोन्याचे दर घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत महागाई कमी झाल्याने भाव घसरले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मागणीतही घट झाली आहे.

लग्नासाठी सोन्याचे दागिने घ्यायचेत? जाणून घ्या खरेदी करताना काय घ्याल काळजी

त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. कोमेक्सवर चांदीमध्ये सुमारे 2% घट झाली आहे. कोमेक्सवर चांदी 22 डॉलर प्रति औंसच्या खाली ट्रेड करत आहे. एमसीएक्सवर चांदी 4 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. एमसीएक्सवर 61, 500 रुपये किलोपेक्षा कमी भाव आहे. सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक पाच अंक आणि दोन अक्षरं असलेला क्रमांक असतो. यातून ग्राहकाला समजते की,तो विकत घेत असलेलं सोनं किती शुद्ध आहे.

सोन्यात खरेदी करण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या

त्यामध्ये सोन्याचं प्रमाण किती आहे. त्यामुळे लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करताना हॉलमार्क नक्की पहा. याशिवाय,सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना त्यासोबत शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. सोनं किती कॅरेटचं आहे,हे चेक करा. दागिन्यात लागलेल्या हिऱ्यांसाठी वेगळं प्रमाणपत्र घ्या.

News18लोकमत
News18लोकमत

कोणत्याही सोन्याच्या दुकानातून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना त्यासोबत पक्के बिल तयार करून घ्या. या बिलामध्ये बाजारभाव किती,मजुरी किती लावण्यात आली,याची नोंद असायला हवी. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात