Home /News /money /

Gold Price Today: सोनं पुन्हा महागलं, आज 10 ग्रॅमसाठी किती काय आहे भाव?

Gold Price Today: सोनं पुन्हा महागलं, आज 10 ग्रॅमसाठी किती काय आहे भाव?

भारतीय सराफा बाजारातील चमक लग्नसराईच्या सीजनसह पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आज पुन्हा एकदा सोने दरात (Gold Price Today) तेजी पाहायला मिळाली आहे.

    नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी: भारतीय सराफा बाजारातील चमक लग्नसराईच्या सीजनसह पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आज पुन्हा एकदा सोने दरात (Gold Price Today) तेजी पाहायला मिळाली आहे. तर चांदीचा दर (Silver Rate) काहीसा कमी झाला आहे. चांदीचा दर आज 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर सोन्याचा डिसेंबर वायदे भाव 48,290 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे. त्यामुळे 2020 च्या तुलनेत अद्यापही सोनं स्वस्त मिळत आहे.

    हे वाचा - Post Office 'या' योजनेत गु्ंतवणूक करुन दरमाह मिळवा हमखास उत्पन्न

    काय आहे आजचा सोन्याचा भाव - मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीव्हरी गोल्डचा दर 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 48,290 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे. काय आहे चांदीचा दर - आज चांदीच्या दरात घसरणीची नोंद झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 61,884 रुपयांवर पोहोचला आहे.

    हे वाचा - 7 वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर क्रूड ऑइलचा दर, पाहा Petrol-Diesel दरावर काय परिणाम

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. कोरोनाचा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Finance, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Investment, Money

    पुढील बातम्या