Home /News /money /

Gold Price Today: सोनं आज पुन्हा स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; दागिने खरेदीपूर्वी चेक करा आजचे नवे दर

Gold Price Today: सोनं आज पुन्हा स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; दागिने खरेदीपूर्वी चेक करा आजचे नवे दर

Gold Price Today: गेेल्या अनेक सत्रांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात 55 हजारांच्या जवळ पोहोचलेले सोने आता 50 हजारांच्या आसपास आहे.

    मुंबई, 4 मे : अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2022) दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver rates) मोठी घसरण झाली. सोन्याचा भाव (Gold Price Today) पुन्हा एकदा 50 हजारांच्या जवळ येताना दिसत आहे, तर चांदी 62 हजारांच्या आसपास व्यवहार करत आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत बुधवारी सकाळी 165 रुपयांनी घसरून 50,643 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. तो सकाळी 50,675 च्या पातळीवर उघडला होता, परंतु गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे सोन्याच्या किमतीत 0.32 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या अनेक सत्रांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात 55 हजारांच्या जवळ पोहोचलेले सोने आता 50 हजारांच्या आसपास आहे. चांदीची चमक देखील कमी MCX वर सोन्यासोबतच चांदीच्या फ्युचर्स किमतीतही (Silver Price Today) मोठी घसरण झाली. सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 331 रुपयांनी घसरून 62,151 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी चांदीचा दर 62,207 रुपयांवर उघडला होता, मात्र गुंतवणूकदारांनी येथे थंड भूमिका घेतली, त्यामुळे भावात 0.53 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या काही सत्रांपासून चांदीच्या दरातही सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात एकेकाळी 72 हजारांच्या आसपास विकली जाणारी चांदी आता 10 हजार रुपयांनी स्वस्त होऊन 62 हजारांच्या आसपास आली आहे. सोनं बनावट किंवा भेसळयुक्त असल्यास कसं ओळखायचं? घरबसल्या 'हे' उपाय करा जागतिक बाजारपेठेत दर काय? जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.21 टक्क्यांनी घसरून 1,864.76 डॉलर प्रति औंस झाली. चांदीही 0.22 टक्क्यांनी घसरून 22.55 डॉलर प्रति औंस झाली. गेल्या महिन्यात जागतिक बाजारातही सोन्याचा भाव 2,000 डॉलर प्रति औंसच्या वर गेला होता, तर चांदीची किंमत 26 डॉलर प्रति औंसच्या वर होती. New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार घसरणीचं कारण काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावण्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमएफने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 3.8 टक्क्यांऐवजी 3.6 टक्के दराने वाढेल. यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत घसरण झाली आणि पिवळ्या धातूची मागणीही वाढली. IMF ने महागाई वाढण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली कारण त्यांची मागणी मंदावली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today, Silver prices today

    पुढील बातम्या