जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी; आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण, काय आहेत सध्याचे दर?

Gold Price Today: सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी; आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण, काय आहेत सध्याचे दर?

Gold Price Today: सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी; आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण, काय आहेत सध्याचे दर?

सोनं खरेदीदारांसाठी सध्याच्या स्थितीत खरेदीचा चांगली संधी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणारे सोन्याचे दर आठवडाभरात काही प्रमाणात कमी झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 एप्रिल : लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोनं खरेदीदारांची या आठवड्यात खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी होती. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Rate Today) साप्ताहिक घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीही स्वस्त (Silver Rate Today) झाली आहे. या व्यापारी आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1129 रुपयांची घट नोंदवली गेली आहे, तर चांदीच्या दरात 3424 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (18 मार्च ते 22 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा दर 53,603 होता, जो शुक्रवारपर्यंत 52,474 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. त्याच वेळी 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 70,109 रुपयांवरून 66,685 रुपये प्रति किलोवर आली आहे. IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही. कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले? » 18 एप्रिल 2022- 53,603 रुपये प्रति 10 ग्रॅम » 19 एप्रिल 2022 - 53,499 रुपये प्रति 10 ग्रॅम » 20 एप्रिल 2022- 52,752 रुपये प्रति 10 ग्रॅम » 21 एप्रिल 2022- रुपये 52,540 प्रति 10 ग्रॅम » 22 एप्रिल 2022- रुपये 52,474 प्रति 10 ग्रॅम गेल्या आठवड्यात चांदीचे दर किती बदलले? » 18 एप्रिल 2022 - 70,109 रुपये प्रति किलो » 19 एप्रिल 2022- 70,344 रुपये प्रति किलो » 20 एप्रिल 2022- 68,590 रुपये प्रति किलो » 21 एप्रिल 2022- 67,330 रुपये प्रति किलो » 22 एप्रिल 2022- 66,685 रुपये प्रति किलो खाद्य तेलामुळे घराचं बजेड बिघडणार? तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता; काय आहेत कारणे आर्थिक वर्ष 2022 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात 55 टक्क्यांनी वाढली 2021-22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढली आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 55 टक्क्यांनी वाढून 39.15 अब्ज डॉलर झाली आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने सांगितले की, 2020-21 मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात 25.40 अब्ज डॉलर होती. FY22 मध्ये सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढली गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात 34.62 अब्ज डॉलर होती. 2021-22 या आर्थिक वर्षात हिरे आणि दागिन्यांची निर्यात जवळपास 50 टक्क्यांनी वाढून 39 अब्ज डॉलर झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात