जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price : एका महिन्यात 4000 रुपयांनी उतरलं सोनं, पुढील आठवड्यातही घसरण होण्याची शक्यता

Gold Price : एका महिन्यात 4000 रुपयांनी उतरलं सोनं, पुढील आठवड्यातही घसरण होण्याची शक्यता

Gold Price : एका महिन्यात 4000 रुपयांनी उतरलं सोनं, पुढील आठवड्यातही घसरण होण्याची शक्यता

जगभरातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आर्थिक रिकव्हरीचे (Economy Recovery Hopes) संकेत मिळत आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : जगभरातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आर्थिक रिकव्हरीचे (Economy Recovery Hopes) संकेत मिळत आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढत आहे. शुक्रवारी कॉमेक्सवर सोन्याची किंमत 1 टक्क्याहून अधिक प्रमाणात घसरली होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या मते सोन्याचे दर (Gold Price) घसरून 1941 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. जगभरातील मोठ्या रेटिंग एजन्सींच्या मते पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येईल, अशी शक्यता कमी आहे. सिटी ग्रृपने त्यांच्या आताच्या अहवालात असे म्हटले आहे की, सोन्यामध्ये तेजीची शक्यता 30 टक्के तर घसरणीची शक्यता 20 टक्के आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जर तेजी आली तर सोन्याचे दर 2275 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात, घसरण झाल्यास सोन्याचे दर 1600 डॉलर प्रति औंसपर्यंत येण्याची  शक्यता आहे. एका महिन्यात 4000 रुपयांनी स्वस्त झाले सोने देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या किंमती घसरत आहेत. रुपयाचे  वधारलेले मुल्य हे या मागचे मुख्य कारण सांगण्यात येत आहे. 10 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर होते, तर आता देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 52 हजारांच्या खाली आहे. (हे वाचा- दर महिन्याला 1000 रुपयांच्या बचतीतून कमवा लाखो रुपये, वाचा कुठे कराल गुंतवणूक ) (हे वाचा- भारताचा GDP 11.5 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता, Moody’s ने देखील व्यक्त केली चिंता ) सलग 4 दिवस सोन्याचे भाव वाढल्यानंतर शुक्रवारी सोन्याचे भाव कमी झाले होते. दिल्लीतील सराफा बाजारात देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेल्या सोन्याच्या किंमतीचा परिणाम पाहायला मिळाला. याठिकाणी सोन्याचे दर 52,643 रुपये प्रति तोळावरून कमी होत 52,452 रुपये प्रति तोळावर आले आहेत. यावेळी सोन्याच्या दरात 191 रुपये प्रति तोळाची घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी एक किलोग्रॅम चांदीची किंमत  70,431 रुपयांवरून 69,950 रुपये प्रति किलो झाली होती. चांदीमध्ये 990 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gold
  • First Published :
जाहिरात
जाहिरात