Home /News /money /

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव, 2 दिवसांत 2000 रुपयांनी स्वस्त झाले सोने

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव, 2 दिवसांत 2000 रुपयांनी स्वस्त झाले सोने

आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोने खरेदी करणे स्वस्त (Gold Price Down) झाले आहे.

    नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोने खरेदी करणे स्वस्त (Gold Price Down) झाले आहे. केवळ दोन दिवसांत दिल्लीतील सराफा बाजारत सोन्याचे भाव (Gold Spot Price) 2132 रुपयांनी कमी झाले आहेत. या काळात चांदीच्या किंमती 4000 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण सुरु (Gold Price Today) आहे. सोन्याचे नवे भाव (Gold Price on 20th August 2020) एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते, गुरूवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 54,311 रुपये प्रति तोळावरून 52,819 रुपये प्रति  तोळा झाली आहे. सोन्याच्या किंमती 1,492 रुपये प्रति तोळाने कमी झाल्या आहेत.  मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती कमी होऊन 52528 रुपये प्रति तोळा आहेत. एकूण दोन दिवसामध्ये सोन्याच्या किंमती साधारण 2132 रुपयांनी कमी झाल्या आहेत. चांदीचे नवे भाव (Silver Price on 20th August 2020) गुरुवारी सोन्याप्रमाणेच चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये चांदीचे भाव 1476 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. त्यामुळे चांदीचे भाव 69,400 रुपयांवरून 67,924 रुपये प्रति किलो झाले आहेत. मुंबईमध्ये चांदीचे दर 66448.00 रुपये प्रति किलो आहेत. पुढे काय होईल? तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या वाढत्या किंमतीची परिस्ंथिती सध्या कमी होऊ शकते. मोठी रेटिंग एजन्सी बँक ऑफ अमेरिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये मॅनेजरने अशी माहिती दिली की येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती कमी होऊ शकतात कारण कोरोना व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) संदर्भात सकारात्मक बातम्या समोर येत आहे. यावर वेगाने काम सुरू आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीमध्ये कोरोना व्हॅक्सिन येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या