गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आतापर्यंत सोनं जवळपास 11500 रुपयांनी स्वस्त झालं आहे. पण सोन्याचे हे घटते दर फार काळ राहणार नाही. सोन्याचे दर पुन्हा वाढणार आहे, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
2/ 6
सध्या प्रति ग्रॅम सोनं 44,400 रुपये ते 45,200 रुपयांदरम्यान आहे. पण लवकरच MCX वर सोनं 46,000 वर पोहोचेल. तर तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या भावात अचानक वाढ होईल, सोन्याची किंमत 45,500 रुपयांच्या पार जाईल ते 48,000 पर्यंत पोहोचेल.
3/ 6
पुढील 2 महिन्यांत सोन्याचे दर प्रति तोळा 48,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असं IIFL सिक्योरिटीजचे वाइस प्रेसिडेंट (कमोडिटी अँड करेंसी) अनुज गुप्ता यांनी सांगितलं. दोन महिन्यांत चांदीसुद्धा प्रति किलो 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असेल.
4/ 6
शनिवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 44,000 रुपयांपेक्षा खाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 22 कॅरेट सोनं 160 रुपयांनी घसरून 43,760 रुपये झालं आहे.
5/ 6
गुड रिटर्न वेबसाइट्सच्या मते, 22 कॅरेटची प्रति तोळा किंमत दिल्ली 43,850 रुपये, चेन्नईत 42,160 रुपये आणि मुंबईत 43,760 रुपये आहे. केरळमध्ये 41,700, लखनऊत 43,850, पाटण्यात 43,760 आहे.
6/ 6
24 कॅरेट सोन्याची किंमत 44,920 रुपये प्रति तोळावरून 44,760 रुपयांवर आली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत केरळ, लखनऊ, पाटण्यात अनुक्रमे 45,490, 47,840, 44,760 रुपये प्रति तोळा आहे.