मुंबई, 06 जून : कोरोनाचा संक्रमण रोखण्यासाठी 70 दिवसांच्या लॉकडाऊनंतर आता हळूहळू अर्थव्यवस्था खुली करण्यात येत आहे. यामध्ये सराफ दुकानंही आता उघडण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सराफ बाजारात सोनं खरेदी करताना अनेक मर्यादा येणार आहेत. यासाठी सराफ बाजारत अनेक बदल करण्यात आले आहेत. हे बदल नेमके कोणते आणि कसे असतील? तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी जाण्याआधी हे बदल आपल्याला माहीत असायला हवेत.
राजधानी दिल्लीमध्ये सराफ बाजार सुरू करण्यात आला आहे. तिथे सर्व प्रथम ग्राहकांनी दुकानात प्रवेश करण्याआधी त्यांचं थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. मास्क आणि ग्लोज घालूनच दुकानात येण्याची परवानगी दिली जाईल. स्टाफ आणि ग्राहक दोघांनीही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे.
हे वाचा-नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा
दुकानात जाण्याआधी दरवाज्यामध्येच सॅनिटायझरची सुविधा असेल. ग्राहकांनी दागिन्यांना हात लावल्यानंतर त्यातून संसर्ग पसरू नये म्हणून त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा वापरण्यात येणार आहे. UV बॉक्समध्ये ठेवून विषाणू घालवले जाणार आहेत. त्यामुळे दागिन्यांमधून संसर्ग पसरण्याचा धोका नसेल.
गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी दिल्लीतील सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 20 रुपयांनी घसरून 47,268 रुपये झाली. तर गुरुवारी 274 रुपयांनी किंमत घसरली होती.
हे वाचा-लॉकडाऊनमध्ये ही कंपनी झाली मालामाल, दुपटीने वाढलं उत्पन्न आणि शेअरचे भाव तर...
हे वाचा-उद्योग क्षेत्रातील मोठं पाऊल; नोकरीसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.