लॉकडाऊनमध्ये ही कंपनी झाली मालामाल, दुपटीने वाढलं उत्पन्न आणि शेअरचे भाव तर विचारू नका

लॉकडाऊनमध्ये ही कंपनी झाली मालामाल, दुपटीने वाढलं उत्पन्न आणि शेअरचे भाव तर विचारू नका

लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. मात्र या कंपनी मात्र मालामाल झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जून : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतेक कंपन्या आर्थिक नुकसानीतून जात असताना, अशी एक कंपनी आहे ज्यासाठी कोरोनाचे संकट वरदान ठरले आहे. या काळात  कंपनीने आपले उत्पन्न दुप्पट केले आहे.

लॉकडाऊन जारी झाल्यानंतर लोक त्यांच्या घरात अडकले आणि ज्यांना शक्य असेल त्यांना घरातून कामाची पद्धत अवलंबण्यास सांगितले. घरुन काम करताना व्हिडीओ संवाद खूप महत्वाचा असतो. ऑनलाइन कॉलर, शिक्षण, मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे.

या क्षेत्रात काम करणार्‍या कंपनीचा व्यवसाय या काळात जोरदार वाढला आहे. गेल्या बर्‍याच दिवसांमध्ये, लोकांनी झूम अ‍ॅप वापरला आहे. या तिमाहीत कंपनीची कमाई दुप्पट झाली आहे. कोरोनामुळे या कंपनीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दुप्पट होऊन 32.8 कोटी डॉलर झाली

महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मंगळवारी कंपनीने आपला अहवाल जाहीर केला. झूमने कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील कमाई दुप्पट 32.8 कोटी डॉलर्सवर आणली, ज्यामुळे कंपनीचा नफा 2.7 कोटी डॉलर्सवर पोहोचला  आहे. यापूर्वीच्या तीन महिन्यात कंपनीची कमाई 1 लाख 98 हजार डॉलर्स इतकी  होती आणि त्यानंतर वॉल स्ट्रीटवरील कंपनीच्या शेअरची किंमत तिप्पट झाली आहे.

या तिमाहीच्या अखेरीस कंपनीला 50 कोटी डॉलर मिळण्याची अपेक्षा

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन म्हणाले की, व्हिडीओ संवाद हा एक मुख्य सेवा म्हणून रुजू होत आहे. या व्यतिरिक्त, व्यवसायातील वाढीसह, कंपनीने चालू तिमाहीत (मे ते जुलै) 50 कोटी डॉलर्सची कमाई नोंदविली आहे. जो  कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या कोणत्याही तिमाहीपेक्षा 4 पट जास्त असू शकतो.

हे वाचा-त्या गर्भवती हत्तीणीला मारणाऱ्या नराधमांचा शोध सुरू; देशभरातून वाढला दबाव

 

First published: June 4, 2020, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading