नवी दिल्ली, 12 जुलै: आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारात आज 12 जुलै 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. चांदीचा दरही (Silver Price Today) कमी झाला आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 46,965 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदी 67,911 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात घसरणीची नोंद झाली आहे. तर चांदीचा भाव स्थिर आहे. सोन्याचा नवा भाव (Gold Price, 12 July 2021) - दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 169 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरण झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 46,796 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. चांदीचा नवा दर (Silver Price, 12 July 2021) - चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 300 रुपये कमी होऊन 67,611 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोने दरात घसरण का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे गोल्ड रेटमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात चढ-उतार झाल्याने भारतीय सराफा बाजारात मौल्यवान धातुच्या किमतीवर परिणाम झाला आहे.
(वाचा - पाच दिवस स्वस्तात करा सोनं खरेदी, असा घ्या फायदा )
दरम्यान, सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सोन्यात गुंतवणूक (Gold investment) करण्याचा विचार असेल, तर या संधीचा फायदा घेऊ शकता.केंद्र सरकार 12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 च्या चौथ्या सीरिजच्या विक्रीची (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) सुरुवात करणार आहे. ही विक्री 16 जुलैपर्यंत चालेल. रिझर्व्ह बँकेनुसार (RBI), या सीरिजमध्ये प्रति ग्रॅम गोल्डची किंमत 4807 रुपये ठेवण्यात आली आहे.