जाहिरात
मराठी बातम्या / मनी / वर्षअखेरीला सोनं आणि चांदी महागलं, हे आहेत आजचे दर

वर्षअखेरीला सोनं आणि चांदी महागलं, हे आहेत आजचे दर

वर्षअखेरीला सोनं आणि चांदी महागलं, हे आहेत आजचे दर

सोनं आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किेंमती वाढल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं महागलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : सोनं आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किेंमती वाढल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं महागलं आहे. सोन्याचा भाव प्रतितोळा 256 रुपयांनी वाढलाय. तज्ज्ञांच्या मते, हे भाव डिसेंबर महिन्यातले सर्वाधिक आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. एक किलो चांदीचे दर 494 रुपयांनी वाढलेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 39 हजार 985 रुपये झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव वाढलेत. न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किंमती 1 हजार 524 डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचे भाव 18.10 डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीचे भावही 48 हजार 313 रुपये प्रतिकिलो झाले. अरुंधती स्वर्ण योजना आसाम सरकार एक जानेवारीपासून दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आणि लग्नाची नोंदणी करणाऱ्या वधुला 10 ग्रॅम सोनं भेट देणार आहे. या मुलींच्या घरचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असण्याची गरज आहे. Arundhati Gold Scheme नुसार प्रत्यक्ष सोनं दिलं जाणार नाही. लग्नाची नोंदणी आणि पडताळणीनंतर वधुच्या 30 हजार रुपये वधुच्या बँक खात्यात जमा केले जातील. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात. किंमतीबद्दल राहा सावधान सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी. पक्कं बिल घ्या सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत. शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा. =========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gold , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात