• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण; तपासा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण; तपासा लेटेस्ट गोल्ड रेट

सोन्याची शुद्धता या तीन गोष्टींमधून ओळखा

सोन्याची शुद्धता या तीन गोष्टींमधून ओळखा

बुधवारी सोने दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : बुधवारी सोने दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबर गोल्ड वायदे भाव 75 रुपयांनी खाली आला असून 47,185 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. याआधीच्या सत्रात गोल्ड रेट 47,260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. बुधावारी सकाळी MCX वर सोने दर 47,241 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. सोन्याप्रमाणे आज चांदी वायदे भावही घसरला आहे. MCX वर डिसेंबर चांदी वायदे भाव 187 रुपयांची कमी होवून 63,398 रुपये प्रति किलोग्रॅमवर सुरू झाला. याआधीच्या सत्रात चांदीचा भाव 63,585 रुपये प्रति किलोग्रॅम होता. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगानिस्तानातील परिस्थितीचा परिणामही सोने दरावर होवून सोने दरात वाढ होऊ शकते. वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे. सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
    Published by:Karishma
    First published: