Home /News /money /

काहीही काम न करण्याचे ‘ही’ कंपनी देतेय 1.41 लाख! वाचा या ड्रीम जॉबच्या अटी

काहीही काम न करण्याचे ‘ही’ कंपनी देतेय 1.41 लाख! वाचा या ड्रीम जॉबच्या अटी

जर तुम्हाला कोणी सांगितले की काहीही काम न करण्याचे तुम्हाला पैसे मिळत आहेत तर? विश्वास बसणार नाही ना.

    नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : जर तुम्हाला कोणी सांगितले की काहीही काम न करण्याचे तुम्हाला पैसे मिळत आहेत तर? विश्वास बसणार नाही ना. पण हे खरं हे. एक कंपनी काहीही काम न करता तुम्हाला 1.41 लाख देणार आहे. द गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, एका विद्यापीठाचा हवाला देत असे म्हटले आहे की जर्मनीच्या एका कंपनीत अर्जदारांना काहीही न करण्याचे पैसे देण्यात येणार आहेत. जर्मनीच्या हॅमबर्ग येथील फाइन आर्ट्स विद्यापीठात (University of Fine Arts, Hamburg) "आळशीपणाचे अनुदान" देण्याची योजना आखत आहे. त्याअंतर्गत विद्यापीठ अर्जदारांना कोणतेही काम न करता फक्त एका जागेवर बसण्यासाठी 1,600 युरो देईल. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 1.41 लाख रुपये असेल. वाचा-EPFO Alert! फोन आणि सोशल मीडिया ही चूक करणं पडू शकतं महागात अर्जात विचारले जातात असे प्रश्न यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. यात तुम्हाला काय करायचे नाही आहे , तुम्ही किती वेळ काहीही काम न करता राहू शकता, कोणते काम अजिबात करू नये अशा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. वाचा-1.46 लाखांपर्यंत पोहोचेल 10 ग्रॅम सोन्याचा भाव, या तज्ज्ञाने दिला इशारा का मिळत आहे काहीही न काम करण्याचे पैसे? खरं तर, हे विद्यापीठा ज्या संकल्पनेबाबत विषयी माहिती शोधत हे, ते आहे डिझाईन थ्योरिस्ट फ्रेडरिक फ्रेडरिक व्हॉन बोरीज यांटी (Friedrich von Borries) संकल्पना. फ्रेडरिक म्हणतात की त्यांचा उद्देश हे समजणे आहे की कोणत्या प्रकारे स्थिरता आणि उच्च प्रशंसा एकत्र अस्तित्वात असू शकतात. या संकल्पनेबाबत सांगताना फ्रेडरिक म्हणले की, आम्हाला 'सक्रिय निष्क्रियतेवर' लक्ष केंद्रित करायचं आहे. जर आपण असे म्हटले की आपण एका आठवड्यासाठी एका जागेवरून हलणार नाही. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे सांगण्यात आले आहे. जानेवारी 2021पासून या रिसर्चवर काम करण्यास सुरुवात होईल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या