1.46 लाखांपर्यंत पोहोचेल 10 ग्रॅम सोन्याचा भाव, या तज्ज्ञाने दिला इशारा; काय आहे नेमकं गणित

1.46 लाखांपर्यंत पोहोचेल 10 ग्रॅम सोन्याचा भाव, या तज्ज्ञाने दिला इशारा; काय आहे नेमकं गणित

या तज्ज्ञाने लॉकडाऊन आधी सोन्याच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज लावला होता

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : वैश्विक आर्थिक अनिश्चिततेच्या दरम्यान सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. जगभरातील गुंतवणुकदार सोन्यात गुंतवणूक करण्यावर जोर देत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी Jefferies च्या ग्लोबल इक्विटी हेड क्रिस्टोफर वुड (Christopher Wood) यांनी सांगितले की, सोन्याच्या किंमतीत सध्या सुरू असलेली वाढ जारी राहणार आहे आणि ही 5,500 डॉलर प्रति आउंसच्या स्तरावर पोहोचू शकते.

सध्याचा स्तर पाहिला तर ही 180 टक्क्यांहून जास्त आहे. तसं पाहता 2020 च्या सुरुवातीत वुडद्वारा लावलेल्या अनुमानपेक्षा ही 31 टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षाच्या सुरुवातीला वूड यांनी अंदाज लावला होता की, सोन्याचे भाव 4,200 डॉलर प्रति आउंस स्तरापर्यंत पोहोचू शकतात. त्यांनी हा अंदाज अमेरिका पर कॅपिटल डिस्पोजेबल इनकम (US Per Capita Disposable Income) च्या आधारावर लावला होता. जानेवारी 1980 मध्ये सोन्याचा भाव 850 डॉलर प्रति आउंसच्या आधारावर कॅलक्युलेट केला होता. आज वुडच्या अंदाजानुसार भारतात सोन्याच्या किंमती 10 ग्रॅमसाठी 1.46 लाख रुपये कशा पोहोचू शकतात, याचं गणित पाहणार आहोत.

कोणत्या आधारावर वुडने हा अनुमान लावला

वुडने इन्वेस्टर्सला लिहिलेल्या नोटमध्ये आपला अंदाज दिला आहे. या दरम्यान सोन्याचा भाव यूएस  डिस्पोजेबल इनकमवर कॅपिटल 9.9 टक्के होता, जो 8,547 डॉलरइतके होता. आता अमेरिकेत 53,747 डॉलर के पर कॅपिटा डिस्पोजेबल इनकमचा 3.6 टक्के आहे. त्यानुसार सध्या यूएसमध्ये सोन्याचा भाव 1,952 डॉलरच्या जवळ आहे. जानेवारी 1980 च्या 9.9 टक्के स्तरावर पोहोचण्यासाठी सोन्याचा भाव 5,345 डॉलर व्हायला हवा. याचा अर्थ 5,500 डॉलर प्रति आउंसचा भाव सद्यस्थिती पाहता तर्कसंगत आहे.

या ब्रोकरेज फर्म्सनांही तेजीची अपेक्षा 

अन्य प्रमुख ब्रोकरेज फर्म्सनेदेखील वुडच्या म्हणण्याला सहमती दर्शवली आहे. BoFA सिक्योरिटीज फंंड मॅनेजर सर्वे (FMS) यांनी ऑगस्ट महिन्यातील किंमतींहाहत सांगितले आहे की, सोन्याबाबत ग्लोबल फंड मॅनेजर्ससाठी दूसरा सर्वात क्राउडेड ट्रेड आहे. या सर्वे मध्ये 23 टक्के मॅनेजर्सचं म्हणणं आहे की, सोन्यातील तेजी जारी राहणार आहे. क्रेडिट सुईस वेल्थ मॅनेजमेंट (Credit Suisse Wealth Management) चं म्हणणं आहे की, अधिक काळासाठी सोन्याच्या किंमती वाढलेल्या स्वरुपात राहतील. त्यांचा अनुमान आहे की, डॉलरचे मूल्य खाली येऊ शकते आणि रियल यील्डमध्ये देखील कमी दिसत आहे. ज्यामुळे सोन्याच्या किंमती वाढत राहतील.

Published by: Meenal Gangurde
First published: August 22, 2020, 9:40 PM IST

ताज्या बातम्या