मराठी बातम्या /बातम्या /मनी /GDP ची घट चिंताजनक! अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी तातडीने ही पाऊलं उचला; रघुराम राजन यांचा महत्त्वपूर्ण सल्ला

GDP ची घट चिंताजनक! अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी तातडीने ही पाऊलं उचला; रघुराम राजन यांचा महत्त्वपूर्ण सल्ला

'भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षाही जास्त नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इटली या दोन्ही देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.'

'भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षाही जास्त नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इटली या दोन्ही देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.'

'भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षाही जास्त नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इटली या दोन्ही देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.'

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत आहे. संपूर्ण देशाला याची चिंता आहे. यादरम्यान रिजर्व बँक ऑफ़ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी आपल्या लिंक्डीन पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात ते म्हणतात की, देशाच्या जीडीपीचे (GDP) आकडे पाहून सर्वांना अलर्ट व्हायला हवं.

राजन (Raghuram Rajan) यांनी पुढे लिहिलं आहे की, जेव्हा इनफॉर्मल सेक्टरचे आकडे जोडण्यात येईल तेव्हा अर्थव्यवस्थेत 23.9 टक्क्यांची घट अधिक वाईट पातळीवर जाऊ शकते. त्यांचं म्हणणं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षाही जास्त नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इटली या दोन्ही देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

राजन पुढे म्हणाले की, भविष्यात प्रोत्साहन रक्कम देण्यासाठी सरकार संसशाधनांना विकण्याची रणनीती तयार करीत आहे, जे आत्मघातकी आहे. व्हायरसवर नियंत्रण आणल्यानंतर सरकारी अधिकारी मदतीचे पॅकेज देण्याचा विचार करीत आहे. त्यांना सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नसल्याचे दिसत आहे. जर असंच सुरू राहिलं तर अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होईल.

हे ही वाचा-जीडीपीमध्ये घट झाल्याने अर्थव्यवस्थेला 20 लाख कोटींचं नुकसान; मोठा फटका बसणार

मदतीच्या पॅकेजशिवाय लोकांचं मोठं नुकसान

राजन म्हणाले की, जर तुम्ही अर्थव्यवस्थेला एक रुग्ण म्हणून पाहाल तर त्याला सातत्याने उपचाराची गरज आहे. राजन यांनी सांगितले की, मदतीशिवाय लोक जेवणं सोडून देतील, ते मुलांना शाळेतून काढून टाकतील आणि त्यांना काम करण्यासाठी वा भीक मागण्यासाठी पाठवतील. कर्ज घेण्यासाठी आपलं सोनं कर्जाऊ ठेवतील, ईएमआय आणि घराचं भाडं वाढवतील. अशा प्रकारे मदत नसल्याने छोटी आणि मध्य कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाहीत. त्यांच्यावरील कर्ज वाढत जाईल आणि शेवटी ती बंद होतील. यानुसार जोपर्यंत व्हायरसवर नियंत्रण आणता येईल, तोपर्यंत अर्थव्यवस्था रसातळाला येईल. पूर्व गव्हर्नर यांच्यानुसार, सरकार रिलीफ आणि स्टिमुलस यावर खर्च करू शकत नाही, असा विचार करणं चुकीचं आहे. ते म्हणाले की संसाधनं वाढविणे आणि योग्य प्रकारे खर्च करण्याची गरज आहे.

First published:

Tags: Raghuram rajan