नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : कोरोना व्हायरसशी (Coronavirus) दोन हात करणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) पहिल्या तिमाहीमध्ये जोरदार झटका सहन करावा लागला आहे. एप्रिल-जून 2020 च्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) तब्बल 24 टक्के घट पाहायला मिळत आहे. हे पाहता वित्तीय वर्ष 2020-21 दरम्यान जीडीपीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयएचे माजी केंद्रीय अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार जीडीपीमध्ये घट झाल्याने देश आणि विविध भागातील लोकांवर परिणाम होऊ शकतो.
देशाची जीडीपी चालू वित्त वर्षादरम्यान 10 ते 11 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की देशाचा जीडीपी आणखी कमी होईल.
सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेचे तीन भाग आहे. यामध्ये पहिला श्रमिक, दुसरा उद्योगपती (छोटे आणि मोठे) आणि तिसरा सरकार जे टॅक्स घेतात. तिन्ही भाग मिळून 100 रुपयांचं उत्पन्न आहे, तर यामध्ये 60.65 टक्के श्रमिक, 20 ते 25 टक्के सरकारकडून 15 ते 20 टक्के उद्योगपती कमवितात. जर अर्थव्यवस्थेत 10 टक्क्यांची घट येत असेल तर यामुळे सर्वांवर याचा परिणाम होईल. मिळालेल्या आकड्यानुसार 10 टक्क्यांची घट झाल्याने अर्थव्यवस्थेला 20 लाख कोटी रुपयांचं नुकसान होईल. जीडीपीमध्ये घट झाल्याने लोकांच्या उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सर्वसामान्यांच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
हे ही वाचा-मोठी बातमी! क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली; IPL 2020 चं वेळापत्रक जारी
सध्या येत असलेले आकडे सामान्य नाहीत, तर पहिल्यापेक्षा खाली आले आहेत. गेल्या वर्षीच्या ज्या आकड्यांशी याची तुलना केली जात आहे, ते आकडेदेखील कमी होते. विजेची विक्री गेल्या वर्षी कमी होती आणि त्याच्या तुलनेत यंदाच्या वर्षीही कमीच आहे. अद्यापही जीएसटीचे आकडे सामान्य स्तरावर पोहोचू शकलेले नाही. सर्विस सेक्टरमध्ये घट आहे. यानुसार दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 12 ते 15 टक्क्यांपर्यंत घट राहू शकते. तिसऱ्या तिमाहीमध्ये परिस्थिती सुधारल्यानंतरही 4 ते 5 टक्क्यांपर्यंत घट राहू शकते. चौथ्या तिमाहीत परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. त्यानुसार वित्त वर्ष 2020-21 मध्ये जीडीपीमध्ये 10 ते 11 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.