जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Fraud Alert: आयुष्मान कार्ड बनवण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, ‘या’ तीन गोष्टींची घ्या काळजी

Fraud Alert: आयुष्मान कार्ड बनवण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, ‘या’ तीन गोष्टींची घ्या काळजी

Fraud Alert: आयुष्मान कार्ड बनवण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, ‘या’ तीन गोष्टींची घ्या काळजी

Fraud Alert: आयुष्मान कार्ड बनवण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, ‘या’ तीन गोष्टींची घ्या काळजी

Fraud Alert: आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र लोकांचं आयुष्मान कार्ड बनवलं जातं, ज्यामधून कार्डधारक 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेऊ शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर: केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारं  दोन्हीही आपापल्या स्तरावर अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात. या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गापर्यंत पोहोचावा हा या योजना चालवण्यामागचा उद्देश असतो. यामध्ये रोजगार ते पेन्शन अशा अनेक महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. अशीच एक योजना म्हणजे ‘आयुष्मान भारत किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ होय. या योजनेंतर्गत पात्र लोकांची आयुष्मान कार्ड बनवली जातात, ज्यामधून कार्डधारक 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेऊ शकतात. ही योजना अत्यंत चांगली असले, तरी काही विकृत मनोवृत्तीचे लोक आयुष्मान कार्ड बनवण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यापासून मागे हटत नाहीत, त्यामुळे या कार्डच्या नावावर होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. चला तर मग जाणून घेऊया या गोष्टींबद्दल… या तीन गोष्टी कधीही विसरू नका:- 1. बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका- आजकाल फसवणूक करणारे अनेक मार्ग शोधतात. या मार्गांद्वारे ते लोकांची फसवणूक करु शकतात. आयुष्मान कार्ड बनवण्याच्या नावाखाली ऑनलाइन आणि ऑफलाइन, फसवणूक करणारे लोकांची फसवणूक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे जेव्हा तुम्ही या कार्डसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देण्याची गरज नाही. तुम्ही असं केल्यास तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. हेही वाचा:  5 दिवसांच्या आठवड्यानंतर आता फक्त 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी! देशात नवीन मॉडेल? 2. बनावट केवायसी टाळा- आयुष्मान कार्डच्या नावानं बनावट केवायसी करून घेण्याचा खेळही फसवणूक करणारे खेळत आहेत. पण तुम्हाला सावध राहावं लागेल आणि फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागेल. कॉल, मेसेज किंवा इतर कोणत्याही पद्धतीनं केवायसी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही लिंक आली तर ती उघडू नका कारण या लिंक बनावट असू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

3. अज्ञात लिंक्सपासून सावध रहा- फसवणूक करणारे तुम्हाला WhatsApp, ईमेल किंवा मेसेजद्वारे लिंक पाठवू शकतात, ज्यामध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय आयुष्मान कार्ड बनवण्यासारख्या अनेक मोहक गोष्टी असू शकतात. परंतु तुम्हाला या लिंक्सबाबत सावधगिरी बाळगावी लागेल, कारण त्याद्वारे फसवणूक करणारे तुमची फसवणूक करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: scheme
  • First Published :
जाहिरात
जाहिरात