जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 5 दिवसांच्या आठवड्यानंतर आता फक्त 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी! देशात नवीन मॉडेल?

5 दिवसांच्या आठवड्यानंतर आता फक्त 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी! देशात नवीन मॉडेल?

5 दिवसांच्या आठवड्यानंतर आता फक्त 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी! देशात नवीन मॉडेल?

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये आठवड्यातून फक्त चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी या मॉडेलवर चर्चा सुरू आहे. याबाबत भारतात नवीन कामगार कोडही (New Labour Code) बनवण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्याच वेळी, यूकेमधील काही कंपन्यांमध्ये चाचणी म्हणून याची सुरुवात करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : स्पर्धेच्या युगात जास्तीत जास्त उत्पादन वाढावं यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास नेहमीच वाढवले जातात. मात्र, प्रत्यक्षात कामगारांना पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर त्याची उत्पादकता कमी होते, असं संशोधनात सिद्ध झालंय. यासाठी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुट्टी देण्याचा सल्ला तज्ज्ञ करतात. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये आठवड्यातून फक्त चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी या मॉडेलवर चर्चा सुरू आहे. याबाबत भारतात नवीन कामगार कोडही (New Labour Code) बनवण्यात आल्या आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्याच वेळी, यूकेमधील काही कंपन्यांमध्ये चाचणी म्हणून याची सुरुवात करण्यात आली आहे. युकेमध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल साधण्याच्या उद्देशावर आधारित, 4-डे वीक पायलट प्रोग्राम (4-Day Week UK Pilot Program) जूनपासून राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. सहा महिन्यांपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा अर्धा वेळ म्हणजे तीन महिने पूर्ण झाले आहेत, त्यामुळे त्याचे काय परिणाम होतील हे जाणून घेणे खूप मनोरंजक असेल. कामगारांच्या आनंदात 50 टक्क्यांनी वाढ सीएनबीसीशी बोलताना, कंटेंट आणि डिजिटल मार्केटिंग कंपनी लिटरल ह्युमन्सचे सह-संस्थापक, गॅडस्बी पीट म्हणाले की 4-वर्किंग डेज संकल्पनेत काही नकारात्मक गोष्टीही आहेत. मात्र, याचे बरेच सकारात्मक परिणाम आहेत. पीटच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून चार दिवस काम केल्याने उत्पादकता 5 टक्क्यांनी कमी झाली. मात्र, कर्मचार्‍यांचा आनंद 50 टक्क्यांनी वाढला आणि त्यामुळे उत्तम प्रतिभा निर्माण झाली. वाचा - Loan settlement | कर्जाची सेटलमेंट म्हणजे कर्ज परतफेड नव्हे! याचा मोठा फटका भविष्यात बसतो ‘काम आणि वैयक्तिक जीवनासाठी चांगले संतुलन’ चार वर्किंग डेजचा वापर सुरू केल्यावर पहिल्यांदा कामगारांना खूप ताण जाणवला. कारण, केवळ चार दिवस असल्याने कामाचा ताण वाढला होता. मात्र, आता त्यांना काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात समतोल साधणे, ही चांगली कल्पना वाटत आहे. एका कर्मचाऱ्याने CNBC ला सांगितले की त्याला आता ही संकल्पना आवडली असून पुन्हा पूर्वीच्या कामाच्या पद्धतीत परतायचे नाहीत. 78% कर्मचारी या संकल्पनेबद्दल आनंदी आहेत ‘द 4-डे वीक ग्लोबल’ हा बिझनेस लीडर्स आणि स्ट्रॅटेजिस्टचा ना-नफा गट आहे. त्यांच्या वेबसाइटवर असा दावा करण्यात आला आहे की सर्वेक्षण केलेल्या 63 टक्के कंपन्यांचा असा विश्वास आहे की ही संकल्पना अंगीकारल्यास उत्तम प्रतिभा असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अधिक अर्ज येतील. दुसरीकडे, 78 टक्के कामगारही या संकल्पनेमुळे अधिक आनंदी आणि कमी तणावात दिसले. ही संकल्पना भारतात कधी येणार? यूकेनंतर, कॅनडा, अमेरिका आणि उर्वरित युरोपमध्ये चार वर्किंग डेजच्या संकल्पनेची चाचणी सुरू होणार आहे. सरकारी पातळीवर बोलायचे झाले तर, नवीन कामगार कोड अंतर्गत केंद्र सरकारने चार दिवस काम, तीन दिवस सुट्टी अशी संकल्पना आणली असून, त्याअंतर्गत चार दिवस 12-12 तास काम करावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी अद्याप कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. भारतात लाँच करण्याबाबत एक्सपर्ट्स फारसे सकारात्मक नाहीत भारतात याची सुरुवात करण्याबाबत तज्ज्ञ फारसे सकारात्मक नाहीत. करिअर सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग फर्म एक्लाटमॅक्सचे (Eclatmax) संस्थापक जॉन पाउलोस यांच्या मते, भारतीय बाजारपेठ अद्याप युरोप आणि अमेरिकेइतकी परिपक्व झालेली नाही. जॉनच्या मते, चार कामाचे दिवस ही संकल्पना सर्व क्षेत्रांना आणि सर्व भूमिकांना लागू करता येणार नाही, पण जिथे ती लागू करता येईल, तिथे कंपन्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात