मुंबई, 5 फेब्रुवारी : देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत (Foreign Exchange Reserves/Forex Reserves) पुन्हा घट झाली आहे. 28 जानेवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 4.531 अब्ज डॉलरने घसरून 629.755 अब्ज डॉलर झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, 21 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 67.8 कोटी डॉलरने घसरून 634.287 अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी, 14 जानेवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 2.229 अब्ज डॉलरने वाढून 634.965 अब्ज डॉलर झाले होते. तर 7 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, परकीय चलन साठा 87.8 कोटी डॉलरने घसरून 632.736 अब्ज डॉलर झाला. Saving Account वर मिळतंय 7 टक्क्यांपर्यंत व्याज, कोणत्या बँकांमध्ये किती व्याजदर; चेक करा FCA 3.504 अब्ज डॉलरने कमी झाला आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 28 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets- FCA) आणि सोन्याच्या साठ्यात झालेली वाढ, जे एकूण चलनाचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. RBI च्या आकडेवारीनुसार, FCAs या आठवड्यात 3.504 अब्ज डॉलरने घसरून 566.077 अब्ज डॉलर झाले. डॉलरमध्ये सांगितली जाणारी FCA मध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यामध्ये वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो. Multibagger Stock : ‘या’’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट, Rakesh Jhunjhunwal यांच्या पोर्टफोलिओत समावेश सोन्याचा साठाही कमी झाला अहवालाच्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 84.4 कोटी डॉलरने कमी होऊन 39.493 अब्ज डॉलर झाले आहे. रिपोर्टिंग आठवड्यात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund- IMF) मध्ये देशाचा SDR (Special Drawing Rights) 14.1 कोटी डॉलरने कमी होऊन 19.011 अब्ज डॉलर राहिला. IMF मधील देशाचा चलन साठा देखील 4.2 कोटी डॉलरने घसरून 5.174 अब्ज डॉलर झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.