मराठी बातम्या /बातम्या /मनी /मोदी सरकारची सर्वोत्तम कामगिरी, देशातील परकीय चलनाचा साठा विक्रमी पातळीवर

मोदी सरकारची सर्वोत्तम कामगिरी, देशातील परकीय चलनाचा साठा विक्रमी पातळीवर

India Foreign Exchange Reserves: देशात परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्यापासूनच प्राधान्य दिलं आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या योजना राबवल्या आहेत. या सगळ्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

India Foreign Exchange Reserves: देशात परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्यापासूनच प्राधान्य दिलं आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या योजना राबवल्या आहेत. या सगळ्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

India Foreign Exchange Reserves: देशात परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्यापासूनच प्राधान्य दिलं आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या योजना राबवल्या आहेत. या सगळ्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 जुलै: कोरोना साथीच्या (Corona Pandemic) संकट काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. देशात परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्यापासूनच प्राधान्य दिलं आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या योजना राबवल्या आहेत. या सगळ्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे देशातील परकीय गंगाजळी अर्थात परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserve) विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि रशियानंतर भारताकडे सर्वाधिक परकीय चलन साठा आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India-RBI) आकडेवारीनुसार, 2 जुलै 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात तब्बल 1.013 अब्ज डॉलर्सची भर पडून तो 610.012 अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. 25 जून रोजी संपलेल्या आधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा 5.066 अब्ज डॉलर्सनं वाढून 608.999 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.

एफसीए (FCA) अर्थात परकीय चलन मालमत्तेत झालेली वाढ हे परकीय चलन साठ्यातल्या वृद्धीचं महत्त्वाचं कारण आहे. एफसीएमध्ये 74.8 कोटी डॉलर्सची वाढ होऊन ती 566.988 अब्ज डॉलर्स झाली आहे. परकीय चलन साठ्यातल्या युरो, पौंड आणि येनसारख्या विविध विदेशी चलनांच्या किंमतीतल्या चढ उताराचा परिणाम लक्षात घेऊन एफसीएचं डॉलर्समधलं एकूण मूल्य निश्चित केलं जातं, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

हेही वाचा-  7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता 'हा' क्लेम करणं झालं अधिक सोपं

दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेकडच्या सोन्याच्या साठ्यातही (Gold Reserve) वाढ झाली आहे. सोन्याच्या साठ्याचं मूल्य 7.6 कोटी डॉलर्सनी वाढून 36.372 अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) असलेल्या एसडीआरचं मूल्य 4.9 कोटी डॉलर्सनी वाढून 1.548 अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेला भारताचा परकीय चलन साठाही 13.9 कोटी डॉलर्सनी वाढला असून, तो 5.105 अब्ज डॉलरवर पोहोचला असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.

कोरोना संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा परकीय चलन साठा अत्यंत महत्त्वाचा असून, या भरभक्कम साठ्यामुळे आपला देश 15 महिन्यांपर्यंतची आयात करण्यासाठी सक्षम झाला आहे. इतर मोठ्या देशांच्या तुलनेत आपण चांगल्या स्थितीत आहोत. जपानमध्ये 22 महिन्यांपर्यंत तर स्वित्झर्लंडमध्ये 39 महिन्यांपर्यंत आयात करण्याची क्षमता आहे.

हेही वाचा- नोकरी गेली?, चिंता नका करु;  सरकार करेल मदत, कशी ते वाचा सविस्तर

कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था बाहेर येईल, तेव्हा आयात वाढेल आणि त्या काळासाठी हा निधी खूप महत्त्वाचा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पुरेशा प्रमाणात परकीय गंगाजळी असेल तर क्रेडिट रेटिंगवरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होईल आणि त्यांचा भारताकडचा ओढा वाढेल. परकीय गुंतवणूकदारांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला ही बाब अनुकूल ठरेल, असं मत आर्थिक तज्ज्ञांनी (Economist) व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Modi government, Money, Multi exchange commodity